अलीगढ : येथील कुलूप बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले दाम्पत्य सत्यप्रकाश आणि रुक्मिणी यांनी आता जगातील सर्वात मोठे कुलूप बनवले आहे. तीस किलोच्या चावीने उघडणारे हे कुलूप अयोध्येत बनत असलेल्या भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराला अर्पण केले जाणार आहे.
हे भव्य कुलूप बनवण्यासाठी सहा महिन्यांचा काळ लागला. कुलपाचे वजन चारशे किलो असून लांबी दहा फूट व रुंदी साडेचार फूट आहे. या कुलपाची चावीच तीस किलो वजनाची आहे! एकूण दोन लाख रुपये खर्च करून हे कुलूप बनवण्यात आले आहे.

मंदिराला दान देण्यापूर्वी या कुलपाचे आणखी काही काम केले जाणार आहे. यापूर्वी सत्यप्रकाश यांनी ३०० किलो वजनाचे कुलूप बनवले होते. ६५ वर्षांच्या सत्यप्रकाश यांनी आता है ४०० किलोंचे कुलूप बनवले आहे. हे कुलूप मंदिराच्या म्युझियममध्ये ठेवले जावे अशी त्यांची इच्छा आहे.
दहा सेकंदांत दात स्वच्छ करणारा ब्रश