Rain Upadate: चक्रीवादळ विरले, पण पाऊसाचा धोका कायम! या जिल्ह्यांना दिला अलर्ट


Last Updated on December 12, 2022 by Piyush

मुंबई : बंगालच्या उपसागरात उठलेल्या मॅन-दस चक्रीवादळाने (Hurricane) तामिळनाडूला तडाखा दिल्यानंतर आता ते विरले आहे. मात्र, आता पुन्हा दुसरीकडे बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमानजवळ (Andaman) चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होणार असून, हवामानात होत असलेल्या सातत्यपूर्ण बदलामुळे विदर्भ वगळून मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Chance of moderate to heavy rain in some districts of Maharashtra including Mumbai today, Monday and tomorrow, Tuesday)

चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून वाऱ्याचा दिशा आणि गती यामध्ये फरक पडला आहे. त्यामुळे अरबी समुद्र, केरळ आणि कर्नाटक किनारी वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ५५ किमी राहील. समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

१३ डिसेंबरला बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमानजवळ पुन्हा चक्रीय वायाची स्थिती तयार होईल. पुन्हा तीच प्रक्रिया सुरू होऊ शकते, तर विदर्भ वगळता मुंबईसह कोकणातील चार व मध्य महाराष्ट्रातील १० (खान्देश, नाशिक ते सांगली सोलापूरपर्यंत) अशा १४ जिल्ह्यांत आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. – माणिकराव खुळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ.

वाचा : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात मोठे बदल, पहा किती मिळाला दर