मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ओळख महिलांसाठी सुरक्षित शहर अशी होती. मात्र हा इतिहास झाला असून आता मुंबईत दिवसाला तीन अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे मुंबई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
मागील ११ महिन्यांत मुंबईत ८२८ अत्याराचे गुन्हे दाखल झाले आहेत. या आकडेवारीनुसार मुंबईत दररोज अत्याचाराच्या सरासरी ३ घटनांची नोंद होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने मुंबईतील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख खाली आला होता. मात्र आता खून, अत्याचार, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आलेख उंचावला आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अत्याचाराचे १३५ गुन्हे वाढले आहेत. तसेच मागील वर्षापेक्षा यावर्षी महिलांविरोधी गुन्ह्यांत वाढ झालेली आहे.
साकीनाका येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोत एका महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक पुन्हा एकदा कालावधीत ८२८ अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांत झालेली आहे. ११ महिन्यांच्या कालावधीतील आकडेवारी पाहता मुंबईत दररोज ३ अत्याचाराच्या घटना घडत आहेत.
यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे ८२८ गुन्ह्यांपैकी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे ४८४ गुन्हे दाखल असून त्यात ९८ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे. ११ महिन्यांच्या कालावधीत मुंबईत १ हजार ९२० विनयभंगाचे गुन्हे घडले असून त्यापैकी १ हजार ६०६ गुन्ह्यांची
उकल करण्यात आली आहे. महिला आणि अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात देखील वाढ झालेली असून ११ महिन्यांच्या कालावधीत अपहरणाचे १००८ गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यापैकी ८६५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. १३ ते १७ या वयोगटातील मुलींच्या अपहरणाचे प्रमाण सर्वाधिक असून प्रेमप्रकरणातून मुली प्रियकरासोबत निघून जातात.
त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा घरी परत येत असतात. मात्र, १८ वयोगटापेक्षा कमी वय असल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पुण्यात कर्वेनगर परिसरात भरदिवसा तरुणाचा खून