Cotton Market: कापसाची तेजी चार दिवसांचीच, पुन्हा भाव 8100 वर….


Last Updated on January 17, 2023 by Piyush

Cotton Market : यंदा कापसाच्या दरात चांगलाच चढ-उतार पहायला मिळत असून, गेल्या आठवड्यात ८५०० पर्यंत गेलेल्या कापसाचे दर पुन्हा ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले आहेत. कापसाचे दर सध्यस्थितीत ७९०० ते ८१०० प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. मकर संक्रातनंतर निर्यात वाढते व भाव वाढतात असा अंदाज लावला जात असतो.

गेल्यावर्षी कापसाचे दर १० ते ११ हजारपर्यंत गेले होते. मात्र, हे दर यंदा कमी झालेले आहेत. हंगाम सुरु झाल्यानंतर काही प्रमाणात कापसाचे दर वाढले होते. मात्र, दिवाळीनंतर कापसाच्या दरात घटच झालेली दिसत आहे. कापसाचे दर वाढत नसल्यामुळे शेतकरी देखील आपला माल विक्री करणे टाळत आहेत..

शेतकऱ्यांना १० हजार रुपये प्रतिक्विंटल अशा भावाची अपेक्षा आहे. भाव वाढत नसल्याने शेतकरी कापूस आणत नसल्याने, संपुर्ण जिल्ह्यातील जिनींग व्यवसायदेखील ठप्प आहे. कॉटन बाजारात मालाअभावी मंदीचे सावट आहे.

arrow

असं झालं तर, कापूस दहा हजार पार जाणार; वाचा इथे क्लीक करून

आतापर्यंत ४ लाख गाठींची खरेदी

खान्देशात दरवर्षी संक्रातपर्यंत ६० टक्के कापसाची खरेदी पूर्ण होत असते. मात्र, यंदा ही आकडेवारी कमी आहे. गेल्या वर्षी १५ जानेवारीपर्यंत एकूण ९ लाख गाठींची खरेदी खान्देशात झाली होती. मात्र, यंदा खान्देशात ४ लाख गाठींची खरेदी झाल्याची माहिती खान्देश जिनींग असोसिएनशचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले.

खान्देशात यंदा कापसाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज होता. मात्र, अंदाज असला तरी त्या दृष्टीने कापसाची आवक खान्देशात झालेली दिसून येत नाही. संक्रांतीनंतर आवक वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे आता २० जानेवारीनंतर आवक वाढेल असा अंदाज लावला जात आहे.

arrow

या तारखेनंतर कापूस दरात होणार विक्रमी वाढ; वाचा इथे क्लीक करून

सौदे झालेच नाही, निर्यात थांबली…

जानेवारी महिन्यात कापूस निर्यातीचे सौदे होतात, त्यामुळे कापसाची निर्यात वाढते व भाव वाढतात. मात्र, सध्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कापसाचे सर्वात जास्त भाव आहेत. त्यामुळे निर्यातदार देश भारताच्या मालापेक्षा इतर देशांच्या मालच खरेदी करत आहेत. यंदा निर्यातीसाठी भारताचे सौदे झालेच नसल्याने निर्यात थांबली असल्याचे मत खान्देश जिनींग असोसिएशनचे संचालक ललित भोरट यांनी दिली.

arrow

या बाजारसमितीत कापसाला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा इथे क्लीक करून