Pune Agriculture Market: कांद्याची आवक वाढली, बाजारभावही कडाडले


Last Updated on December 19, 2022 by Piyush

पुणे : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढूनही बाजारभाव वाढले. बटाट्याच्या भावात किंचित वाढ झाली. तर टोमॅटो, फ्लॉवर, कोबी व वांग्याची आवक आणि भावातही मोठी घट झाली. ढोबळी मिरचीची प्रचंड आवक झाली.

लसणाची आवक स्थिर राहूनही भावात घट झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर जुड्यांची दुपटीने आवक वाढल्याने भावात घसरण झाली. जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक झाली. शेळ्या- मेंढ्यांची संख्या वाढूनही होऊनही भाव स्थिर राहिले आहेत. एकूण उलाढाल २ कोटी ४० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची

एकूण आवक १ हजार ५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने वाढूनही कांद्याचा भाव १ हजार ५०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक २ हजार ७५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही बटाट्याच्या भावात १०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २ हजार २०० रुपयांवरून २ हजार ३०० रुपयांवर पोहचला. जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कमाल भाव ४ हजार रुपयांवर आले. हिरव्या मिरचीची एकूण आवक १२२ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार ते ३ हजार रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :

कांद्याची एकूण आवक १ हजार ५०० क्विटल झाली असून त्यास पहिला भाव १ हजार ५०० रुपये, दुसरा भाव १ हजार २०० रुपये तर तिसरा भाव ८०० रुपये मिळाला आहे. बटाट्याची एकूण आवक २ हजार ७५० क्विटल झाली असून प्रथम क्रमांकाचा भाव २ हजार ३०० रुपये मिळाला. तसेच दुसरा भाव १ हजार ८०० तर तिसरा भाव १ हजार ५०० रुपये मिळाला आहे.

फळभाज्या

एकूण आवक क्विटलमध्ये व प्रतिदहा किलोचा भाव : टोमॅटो – ३३० क्विटल (५०० ते १,००० रु.). कोबी २०८ क्विटल (५०० ते ७००रु.). फ्लॉवर- २२५ क्विटल (३०० ते ५०० रु.), वांगी – ७१ क्विटल [१,००० ते २,००० रु.). भेंडी – ८६ क्विटल (१,००० ते ३,००० रु.), दोडका ६४ क्विटल (१,००० ते २,००० रु.). कारली १- ७६ क्विटल (१,००० ते २,००० रु.), दुधीभोपळा – ६२ क्विटल [१,००० ते २,०००रु.), काकडी- ६४ क्विटल (१,००० ते २,००० रु.), फरशी – ५२ क्विटल (१,००० ते २,००० रु.), वालवड – ६६ क्विटल (१,००० ते ३,००० रु.), गवार ५६ क्विटल [ ३,००० ते ६,००० रु.), ढोबळी मिरची ३२५ क्विटल – (१,००० ते ३,००० रु.), चवळी – ४६ क्विटल (१,००० ते २,००० रु.). वाटाणा – १९० क्विटल ( २,००० ते २,५००रु. ) शेवगा – २२ क्विटल (१०,००० ते १३,००० रु.), गाजर ७२ क्विटल (१,००० ते २,००० रु.)

पालेभाज्या

पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांचा भाव : मेथी – एकूण २८ हजार ५८० जुड्या (४०० ते ६०० रु.), कोथिबीर – एकूण ३८ हजार ९५० जुड्या [२०० ते ३०० रु.), शेपू – – एकूण ३ हजार ३०० जुड्या (४०० ते ६०० रु.), पालक- एकूण ४ हजार १० जुड्या (५०० ते ७०० रु.).

जनावरे

चाकणला विक्रीसाठी आलेल्या ९० पैकी ६० म्हशींची विक्री झाली. २५ हजार ते ४० हजार भाव मिळाला. ७ हजार २७० आलेल्या शेळ्यापैकी ६ हजार ४५० शेळ्यामेंढ्यांची विक्री झाली. शेळ्यांना २ हजार रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

वाचा : अखेर अकोट बाजारात कापूस खरेदी सुरू! सौदापट्टीत केले मोठे बदल