म्यानमार : म्यानमार म्यानमारमध्ये किशोरवयीन मुलांमध्ये एक वेगळाच ट्रेण्ड हल्ली दिसून येत आहे. येथे किशोरवयीन मुले शाळा सोडून जंगलात बनलेल्या एका विद्रोही शिबिरामध्ये लष्करी प्रशिक्षण घेऊ लागली आहेत. त्यांना या शिबिरामध्ये लाकडी बंदूक दिली जाते. जी बंदूक प्रत्यक्षात गोळ्या चालवण्याच्या कामाची नसते. मात्र किशोरवयीन मुले दिवसभर अशा नकली बंदुका खांद्यावर घेऊन वावरताना दिसतात.
या मुलांना सैन्याशी लढण्यासाठी गनिमी कावा शिकवला जातो. म्यानमारमध्ये सरकार उलथण्याला १० महिने झाले आहेत. या कालावधीत म्यानमारच्या लष्कराने जनतेवर अनन्वित अत्याचार केले आहेत.
त्याचबरोबर फुटिरतावाद्यांनीही जनतेवर अत्याचार केले आहेत. लष्करी कारवाईमुळे पीपल्स डिफे न्स फोर्सच्या (पीडीएफ) लोकांना घरदार सोडून जंगलात आश्रय घ्यावा लागला आहे. असे असूनदेखील पीडीएफच्या सदस्यांचा सरकारशी लढण्याचा निर्धार कायम आहे. किशोरवयीन मुलांना लष्करातील कमांडोजसारखे खडतर प्रशिक्षण दिले जाते.
त्यासाठी लष्कराची नोकरी सोडून आलेले काही अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. हाती आलेल्या वृत्तानुसार पीडीएफ कमांडोजकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारे नाहीत. तरीदेखील हे कमांडोज सरकारशी लढण्यासाठी खडतर प्रशिक्षण घेत आहेत.
फॅमिली सलूनमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, 2 मुलींची सुटका