अमरावती: शिक्षकाने गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार परतवाडा शहरात समोर आला आहे. शहरातील नामांकित मराठी पूर्व माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनीशी घृणास्पद कृत्य परतवाडा शहरातील नामांकित मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या एका शिक्षकाने केले. हा प्रकार 23 डिसेंबर रोजी शाळेत केल्याचे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उघड झाला. मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून शिक्षकाविरोधात परतवाडा पोलिसांनी भांदवी अन्वये 354 सी, बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील एका उच्चभ्रू शाळेत नाताळ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात 23 डिसेंबर रोजी शाळेतील एका रिकाम्या वर्गात कार्यक्रमानिमित्त अल्पवयीन विद्यार्थिनी कपडे बदलत असताना शिक्षकाने दुसऱ्या वर्गाच्या खिडकीतून डोकावून पाहत असल्याचे विद्यार्थिनीच्या निर्दशनास आले. त्याचप्रमाणे या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला भूगोल विषयाचे बुक तपासण्याकरिता गेली असता घाणेरडे बोलून तिची छेड काढली.
शिक्षक मुलींच्या अंगावरून जाणीवपूर्वक हात फिरविणे, खर्रा आणायला सांगणे अशा अनेक बाबी तक्रारीत विद्यार्थिनींनी नमूद करीत मुख्याध्यापिकेला दिली. त्यावर मुख्याध्यापिकेने त्या शिक्षकाला समज देत माफीनामा लिहून घेतला. मुलींना कपड़े बदलविताना पाहिल्यानंतर कायदेशीर कारवाई व्हावी. याकरिता 4 जानेवारी रोजी पोलिस स्टेशनला मुख्याध्यापिकेने लेखी स्वरुपात अर्ज देत तक्रार केली.
या घटनेच्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात या शिक्षकाने केलेले हे कृत्य निश्चितच घृणास्पद आहे. विद्यार्थिनींनी न घाबरता मुख्याध्यापक व पालकांना याची माहिती दिल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या शिक्षकाचे वर्तन योग्य नसल्याने यापूर्वी अशा अनेक तक्रारी यापूर्वी झाल्याचे शाळा प्रशासन व पालकांच्या वतीने सांगण्यात येते. या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास केला जात असल्याची माहिती ठाणेदार संतोष ताले यांनी दिली.
पुणे हादरले! भाडे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार ताज्या बातम्याक्राईमपुणे …