SWCD Government Jobs : महाराष्ट्र मृदा व जलसंधारण विभागात 670 जागांवर भरती; पगार सुद्धा मिळणार लाखोंमध्ये, आत्ताच करा अर्ज…,

SWCD Maharashtra Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि.१९/१२/२०२२ तसेच शासन शुध्दीपत्रक दि. १४/०७/२०२३ व दि.२०/०१/२०२३ कडील शासन पत्र संदर्भ क्र. आस्थाप-२०१८/प्र.क्र.१८/जल-२ दि. १९/१२/२०२२ अन्वये सामान्य प्रशासन विभागाने मृद व जलसंधारण विभागाच्या अधीपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधीकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रीत) या संवर्गातील ६७० रिक्त पदांच्या भरती करिता मान्यता दिलेल्या प्रवर्ग निहाय आरक्षणा नुसार दर्शविण्यात आलेली पदसंख्ये नुसार सरळसेवेने रिक्त पदे भरती करिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमुद केलेप्रमाणे शैक्षणीक अहंता व इतर अटींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून मृद व जलसंधारण विभागाच्या https://swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दि.२१/१२/२०२३ ते दि.१०/०१/ २०२४ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Govt Jobs 2023 : सदर पदांवरील भरती करिता ऑनलाईन परिक्षा महाराष्ट्रातील निश्चीत केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमुन दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परिक्षेची तारीख विभागाच्या संकेतस्थळावर अत्यावश्यक प्रसिध्द करण्यात येईल. सदर संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधी आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल. ऑनलाईन परीक्षेची तारिख विभागाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. सदर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या मृद जलसंधारण विभागाच्या https://swcd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मृद व जलसंधारण विभाग मध्ये जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या ६७० जागेच्या भरतीची जाहिरात मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १० जानेवारी २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा खाली उपलब्ध आहे.

 Department of Soil and Water Conservation Bharti 2024

● पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब.

● पद संख्या : 670 जागा

● शैक्षणिक पात्रता : स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : अमागास : रु.1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग : रु.900/-]

● वेतनमान : रु.41,800/- ते रु.1,32,300/- 

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● मृद व जलसंधारण विभाग भरती २०२३ महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. SWCD Government Jobs