अग्नी-५ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी


Last Updated on December 16, 2022 by Vaibhav

भुवनेश्वर: अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये चीनसोबतच्या संघर्षानंतर वास्तविक नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण असताना भारताने ‘अग्नी-५’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. तब्बल ५,४०० किमीपर्यंत मारक क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र चीनची राजधानी बीजिंगपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे.

ओडिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून आंतरखंडीय अण्वस्त्र सक्षम ‘अग्नी-५ ‘बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रात्रीच्या वेळी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी गुरुवारी दिली. नवीन तंत्रज्ञान व उपकरणासह ही चाचणी घेण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत हे क्षेपणास्त्र अधिक दूरपर्यंत अचूक मारा करण्यास सक्षम झाले आहे. चीनसोबतच्या संघर्षापूर्वीच भारताने या चाचणीची घोषणा केली होती. या क्षेपणास्त्राची ही नववी चाचणी होती. २०१२ साली या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेण्यात आली होती.

हेही वाचा: नवीन वस्त्रोद्योग धोरणात वीज दरात सवलतीची मागणी