शहरात शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रुपये; असा करा अर्ज | student yojana


Last Updated on January 31, 2023 by Piyush

student yojana : महाविद्यालये सुरू झाली आहेत पण वसतिगृहात प्रवेश मिळत नाही म्हटल्यावर अनेक विद्यार्थ्यांचे खर्चाचे गणित बिघडते किंवा काहींना वसतिगृहात प्रवेश न घेता अन्यत्र खोली घेऊन राहणे सोयीचे असते. अशांसाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ उपयुक्त ठरत आहे.

काय आहे योजना ?

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अथवा प्रवेश न घेतलेल्या विद्याथ्यांपैकी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच यानंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. प्रवेशासाठी पात्रता निकष आहेत. विद्यार्थ्यांना भोजन, निर्वाह भत्ता, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी आधार संलग्न बँक खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाते.

याप्रमाणे मिळते रक्कम

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर याठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी.

भोजन भत्ता : ३२,०००
निवास भत्ता: २०,००० निर्वाह भत्ता : ०८,०००
प्रति विद्यार्थी : ६०,०००

इतर महसूल विभागीय शहरांतील व उर्वरित क वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी

भोजन भत्ता: २८,०००
निवास भत्ता : १५,०००
निर्वाह भत्ता : ०८,०००
प्रति विद्यार्थी : ५१,०००

इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी व महापालिका हद्दीपासून पाच किमी परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश असल्यास

भोजन भत्ता: २५,०००
निवास भत्ता : १२,०००
निर्वाह भत्ता : ०६,००० प्रति विद्यार्थी : ४३,०००

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा