Solar Pump Scheme : महावितरणकडून वीस पुरवठा शक्य नसलेल्या भागात महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणेच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप केले जाते. या योजनेंतर्गत एक लाख पंपांच्या उद्दिष्टापैकी सुमारे 25 हजार पंपांचे वाटप अद्याप झालेले नाही. त्यासाठी बुधवारपासून (ता. 17) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे
कुणाला किती अनुदान?
पीएम कुसुम योजनेत शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदान दिले जाते. सर्वसाधारण गटासाठी 90% आणि अनुसूचित जाती आणि जमाती गटासाठी 95% अनुदान दिले जाते. केंद्राचा वाटा 30% आहे, तर राज्याचा 60 ते 65% वाटा आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 2021 पर्यंत राज्यासाठी 1 लाख सौर पंपांचे उद्दिष्ट ठेवले होते.
सोलर पंम्प साठी अर्ज करण्यासाठी
इथे क्लीक करा
अर्जांची छाननी | Solar Agriculture Pump Scheme
आतापर्यंत राज्यभरातून 1 लाख 18 हजार 898 जणांनी यासाठी अर्ज केले होते. त्यातील 99 हजार 331 अर्जाची छाननी करण्यात आली.
पात्र अर्जदारांपैकी 70 हजार 529 जणांनी स्व-हिश्शाची रक्कम भरली आहे. तर 69 हजार 669 अर्जदारांनी सोलर पंप पुरवठादाराची निवड केली आहे. त्यानंतर 56 हजार शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसवण्यात आले आहेत.
सोलर पंम्प साठी अर्ज करण्यासाठी
इथे क्लीक करा
पुढील एक लाख पंपांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीही लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून मागणी कमी आहे. तर औरंगाबाद विभागासाठी उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. जिल्ह्यांच्या उद्दिष्टानुसार हे पंप वितरित केले जातील. उर्वरित पंप, जिथे अर्ज कमी आहेत, ते इतर जिल्ह्यांना वाटप केले जातील. रवींद्र जगताप, महासंचालक, मेडा.