मुंबईत कमी पैशात घ्या मोठं घर, कोकण मंडळाच्या लॉटरीत आतापर्यंत फक्त 2500 अर्ज | Mhada Lottery 2023

Mumbai Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या कोकण सप्टेंबर 5311 सदनिकांच्या (2 bhk flat in thane) विक्रीसाठी काढण्यात येणाऱ्या ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू झाली असून, आतापर्यंत 2 हजार 502 अर्जदारांनी अर्ज केले असून 904 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे.

ठाणे शहर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे विविध गृहनिर्माण योजनांतर्गत बांधण्यात आलेल्या 5311 सदनिकांसाठी (mhada 2 bhk flat in thane) संगणकीकृत सोडती 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या मुख्यालयाच्या प्रांगणात काढण्यात येणार आहे.

काय येत आहे अडचणी? 2 bhk flat thane

  1. एकाच्या नावाने अर्ज भरताना पॅन क्रमांक व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत असल्याने फॉर्म पुढे जात नाही.
  2. इतर कोणतेही युझर नेम वापरले असल्यास बँक खाते व्हेरिफिकेशन पेंडिंग दर्शवित आहे.
  3. संगणकावर दोन-तीन युजरनेम करूनही अडथळे निर्माण होत आहे.
  4. मोबाईल अॅपद्वारे अर्जाची प्रक्रिया काहीशी वेगवान आहे.

कोकण विभागाच्या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1010 सदनिका आहेत. फ्लॅट विक्री सोडतीची लिंक 16 ऑक्टोबर संध्याकाळी 5.59 पर्यंत सक्रिय राहील. अर्जदार 18 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रक्कम ऑनलाइन भरू शकतात.

वाचा : ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी अकरा लाखात म्हाडाची घरे । Thane Mhada Flat

अर्जदार 18 ऑक्टोबर रोजी बँक कार्यालयीन वेळेपर्यंत ठेवीची रक्कम भरू शकतात. पात्र अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या वेबसाइटवर 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाईल. अर्जदार 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन हरकती दाखल करू शकतात.

वाचा : मुंबई व ठाण्यात सरकार देणार अवघ्या 9 लाखात घर, पहा डोंबिवली व ठाण्यातील सॅम्पल फ्लॅट । 2 bhk flats in mumbai thane

1 thought on “मुंबईत कमी पैशात घ्या मोठं घर, कोकण मंडळाच्या लॉटरीत आतापर्यंत फक्त 2500 अर्ज | Mhada Lottery 2023”

Leave a Comment