शरद पवारांची आक्रमक भूमिका, कर्नाटकला इशारा!


Last Updated on December 7, 2022 by Vaibhav

मुंबई : कर्नाटकातील आगळीकीवर महाराष्ट्र सरकारने ‘भूमिका घ्यायला हवी होती. येत्या ४८ तासांत परिस्थिती सुधारली नाही, तर तिथल्या मराठी माणसांसाठी मी स्वतः बेळगावात जाईन. त्यानंतर जे होईल, त्याला कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.महाराष्ट्राने नेहमीच संयमाची भूमिका घेतली आहे. परंतु संगा देखील मर्यादा असतात. परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर आता वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देऊन पवार म्हणाले, खरे तर यावर राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होते, पण दुर्दैवाने ती घेतली जात नाही. आज झालेल्या हल्ल्यांनी सीमाभागात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

येत्या २४ तासांत वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत, तर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल, त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावांवर हक्क सांगितल्यानंतर महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. बेळगावमधील हिरे बागेवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यात शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील बसना काळा आणि भगवा रंग लावला. आणखीही अनेक संघटना या हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत.हेही वाचा: सीमावादाचा भडका: कर्नाटकी मुजोरीमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट