घरकुल योजना 2023 | या नागरिकांना घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपये; इथे पहा GR शासन निर्णय, अर्ज नमूना आणि योजनेचा लाभ घ्या..!

Sabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra Application Form : सर्वांना नमस्कार, आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

शबरी आदिवासी घरकुल योजना 2023-24 – Shabari Adivasi Gharkul Scheme :

संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार व सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामधील उपलब्ध अर्थसंकल्पिय तरतूद लक्षात घेऊन सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हानिहाय ग्रामीण भागासाठी एकूण १,०७,०९९ उद्दिष्ट/लक्षांक निश्चित करण्यास खालील अटींचे पालन करण्याच्या अधिन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.

घरकुल योजना 2023
घरकुल योजना 2023

शबरी आदिवासी घरकुल योजनेचे स्वरूप :- आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.

शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
  2. जातीचे प्रमाणपत्र
  3. रहिवासी प्रमाणपत्र
  4. 7/12 उतारा व नमुना 8-अ
  5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
  6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
  7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला
  8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
  9. ग्रामसभेचा ठराव

शबरी आवास योजनेकरीता संपर्क कुठे करावा?

शबरी आवास योजना अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय या पत्त्यावर किंवाच तालुका पंचायत समिती कार्यालयात संपर्क करावा आणि या योजने संबंधित अधिक माहिती मिळवावी.

लाभार्थीचे घरकुल बांधकाम सुरु असतांना संबधित जिल्हा व तालुका स्तरावर घरकाम बांधकामाचा आढावा घेतला जातो आणि त्यानुसार लाभार्थीस अनुदान वितरीत केले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील ग्राम पंचायत, पंचायत समिती तसेच गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता. इतर आदिवासी योजनांच्या अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, त्यासाठी – येथे क्लिक करा.

शबरी घरकुल योजना 2023 अटी :

१. ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१.२० लक्ष मर्यादेत आहे, केवळ अशाच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.

२. शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेअंतर्गत लाभ देतांना दि. २८.०३.२०१३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमाबरोबरच आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा.

३. शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदर योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे. यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात यावे.

४. लाभार्थी निवड करताना लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी (Physical Verification) करुन पात्र लाभार्थ्यांची निवड करावी.

५. या व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदींचे व याबाबत शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या शासन नियमांचे व कार्यपध्दतीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे..

६. आदिवासी उपयोजनेतर्गंत आदिवासी क्षेत्रांतर्गंत येणाऱ्या जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाहय क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या मंजूरीचे अधिकार हे शासन निर्णय, आविवि दि. २५.०४.२०२३ अन्वये गठीत केलेल्या संबंधित जिल्हाच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीस राहील. तसेच सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या उद्दिष्टांमध्ये जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वितरण करताना त्या जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थी उपलब्ध नसल्यास त्या तालुक्याचे उद्दिष्ट त्या जिल्ह्यांतंर्गत पुनर्वितरीत करण्याचे अधिकारही या समितीस राहतील.

७. संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेऊन घरकुलांचे बांधकाम दर्जेदार आणि चालू आर्थिक वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्याबरोबर प्रगतीचा अहवाल दर तीन महिन्यांनी न चुकता आयुक्त, आदिवासी विकास आणि संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष यांनी एकत्रित रित्या शासनास सादर करावा.

८. घरकुलावर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बोधचिन्ह लावण्यात यावे.

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय :- शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षाकरीता ग्रामीण भागाकरीता घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी – इथे क्लिक करा. व PDF अर्ज डाउनलोड करा