Last Updated on December 4, 2022 by Piyush
मध्य प्रदेश : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देश कितीही प्रगत झाला तरी देशाची 60 टक्के लोकसंख्या आजही रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. शेती हा पूर्णपणे नैसर्गिक ऋतुचक्रावर आधारित व्यवसाय आहे. यात थोडासा बदलही कृषी व्यवसायावर मोठा परिणाम करतो. बटाटे आणि कांद्याची शेती याचे एक मोठे उदाहरण आहे.
मार्च-एप्रिलमध्ये कांद्याची काढणी होते, त्यामुळे त्या काळात त्याची विक्री करून शेतकऱ्याला फक्त किलोमागे दोन ते तीन रुपये नफा मिळतो. मात्र तोच माल जर त्याने साठवला तर त्याच मालाची पावसाळ्यात विक्री करून किलो मागे 35 रुपये नफा होतो. शेतीतील अडते माल साठवून हेच करतात आणि नंतर बक्कळ कमाई करतात. मात्र मध्य प्रदेशातील एका 21 वर्षीय तरुणाने यावर तोडगा काढलेला आहे.
मध्य प्रदेशातील झाबुआ गावातील रोहित पटेल या 21 वर्षीय तरुणाने कांदा साठवण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय शोधून काढला आहे. रोहितच्या या युक्तीमुळे शेतकऱ्याला कमी खर्चात कांद्याची साठवणूक करणे शक्य होणार आहे. जेणेकरून त्याला अधिक नफा मिळू शकेल.

हिंदी वेबसाइट द बेटर इंडियाने रोहित पटेलने केलेल्या तोडग्याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितने उन्हाळ्यात तयार झालेल्या कांद्यांचे कोल्ड स्टोरेज विषयी माहिती दिली आहे. खिडकी नसलेल्या खोलीत जमिनीपासून 8 इंच अंतरावर विटा रचून आणि त्यावर लोखंडी जाळी बसवली. व त्या जाळ्यावर कांदा साठवणूक केली आहे. खालून कांद्याला हवा देण्यासाठी लोखंडी जाळीवर एक्झॉस्ट फॅन बसवण्यात आला आहे. यामुळे कांदे सडण्यापासून वाचतील आणिकाही महिन्यांपर्यंत टिकतील.

हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध करून देतो. कांदा उत्पादक या पर्यायाचा वापर करून कांदा महिनाभर साठवू शकतात आणि चांगला नफा मिळवू शकतात. त्यापैकी अनेकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अशाच युक्त्या अनेक शेतकरी योजत असतात. त्या अनेकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. म्हणजे इतर शेतकरीही त्याचा फायदा घेऊ शकतील.
वाचा : तुरीवर किडींसाठी थंडीमुळे पोषण वातावरण..! असे करा तुरीवरील किडीचे नियंत्रण