सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने आपले कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू केली आहे. मार्केट रेग्युलेटरने 120 वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. SEBI ही भरती अशा वेळी करत आहे जेव्हा पुढील काही महिन्यांत लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा (LIC) IPO येत आहे, जो देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असू शकतो.
या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे सेबीला आपली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यास मदत होईल. SEBI ने विधी, माहिती तंत्रज्ञान, संशोधन, सामान्य आणि अधिकृत भाषेशी संबंधित अनुभवी अधिकाऱ्यांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पुढील चार महिन्यांत संपूर्ण भरती मोहीम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सेबीमध्ये सध्या सुमारे 850 कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी, बाजार नियामकाने विक्रमी संख्येने कंपन्यांना त्यांचे IPO लॉन्च करण्याची परवानगी दिली. यंदा ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सेबी आतापासूनच यासाठी तयारी करत आहे.
SEBI ने यापूर्वी मार्च 2020 मध्ये 147 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते आणि सुमारे 1.4 लाख लोकांनी त्या पदांसाठी अर्ज केले होते. या व्यतिरिक्त, SEBI ने बुधवारी विविध क्षेत्रांसाठी असिस्टंट मॅनेजर (अधिकारी ग्रेड A) पदासाठी एकूण 120 रिक्त जागा देखील जारी केल्या.
पात्र उमेदवार या पदासाठी 24 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यानंतर फेब्रुवारी-एप्रिल दरम्यान या पदांवर नियुक्तीसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे वस्तीगृह बंद करण्याचा निर्णय