नवी मुंबईत सिडकोचे सी व्यू अपार्टमेंट..! पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती । Sea facing flats in mumbai

Sea facing flats in mumbai : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोणे ‘सर्वांसाठी घरं’ या योजनेअंतर्गत नवी मुंबई आणि पनवेल पालिका हद्दीत 53 हजार घरे बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यातील 2040 टू बीएचके घरे खारघर रेल्वे स्थानक शेजारी उभारली जात आहे. हे घरे सर्वसामान्य कुटुंबासाठी आहे की श्रीमंतासाठी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

सिडको ने अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी नवी मुंबई, उरण, उलवे, वाशी आणि पनवेल पालिका क्षेत्रातील सिडकोच्या राखीव भूखंडावर 53 हजार घरे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील 20000 घरे हे खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, नावडे, खारघर आणि वाशी ट्रक टर्मिनल आधी ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

सिडकोचे सी व्यू अपार्टमेंटचे सॅम्पल फ्लॅट व किंमत पाहण्यासाठी येथे क्लीक करा

काही ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक यांनी सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत सर्वसामान्य कुटुंबांना घरे मिळावी म्हणून ही घरे पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सिडको ने आराखडा देखील तयार केला होता.

खारघर सेक्टर 1 अ खारघर रेल्वे स्टेशन पासून पन्नास मीटर अंतरावर ट्रक टर्मिनल येथे ही घरे उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही घरे सर्वसामान्यांसाठी की श्रीमंतांसाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार खारघर रेल्वे स्थानक शेजारी 15 मजल्याच्या एकूण 17 इमारती उभारण्यात येत आहे. प्रत्येक मजल्यावर टू बीएचके घरे असणार आहेत. या गृहनिर्माण प्रकल्प उभारणीचा ठेका एका नामांकित कंपनीने घेतला आहे.

सिडकोचे सी व्यू अपार्टमेंटचे सॅम्पल फ्लॅट व किंमत पाहण्यासाठी येथे क्लीक करा

मोक्याच्या ठिकाणी प्रकल्प

खारघर रेल्वे स्थानक शेजारी उभनात येणाऱ्या गृहप्रकल्पात खाडी किनारा आहे. त्यामुळे येथे थंड वातावरण तसेच गच्चीवरून समुद्रात येणारी भरती ओहोटीचा आनंद घेता येणार आहे. तर दुसऱ्या भागाला जोडून नवी मुंबई विमानतळ आहे. तसेच या प्रकल्पाला लागून सिडको खारघर बेलापूर कोस्टल रोडच्या कामाला सिडको ने मंजुरी दिली आहे. खारघर वरून कोस्टर रोड मार्गे बेलापूर, मुंबई तसेच नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी सोयीचे होणार आहे.

सिडकोचे सी व्यू अपार्टमेंटचे सॅम्पल फ्लॅट व किंमत पाहण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Comment