RTE Admission 2023 : शाळेच्या मोफत प्रवेशासाठी आजपासून अर्ज करता येणार


Last Updated on March 1, 2023 by Piyush

RTE Admission 2023 : खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये एकूण पटसंख्येच्या तुलनेत (पहिली ते आठवी) २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’ (RTE Admission 2023) अंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. १ मार्चपासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पालकांना १७ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

‘आरटीई’ अंतर्गत वंचित घटक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळतो. वंचित घटकांत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग, दिव्यांग, अनाथ, एचआयव्हीग्रस्त तसेच कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ जातीच्या दाखल्यावर प्रवेश अर्ज करता येतो.

दुर्बल घटकासाठी मात्र तहसीलदारांचा १ लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला लागेल.

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे RTE Admission 2023

निवासाचा पुरावा (रेशन कार्ड, वाहन परवाना, वीजबिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी एक. निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार.) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म दाखला उत्पन्नाचा दाखला (१ लाखाच्या आत). जातीचे प्रमाणपत्र.

जवळच्या १० शाळा निवडता येणार

अर्ज भरताना निवासापासून जवळच्या दहा शाळा निवडता येतील. यापूर्वी लाभ घेतला असेल तर पुन्हा अर्ज करता येणार नाही. एकच परिपूर्ण अर्ज भरावा, पुन्हा अर्ज भरता येणार नाही.

लॉटरी पद्धतीने निवड

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राप्त अर्जामधून लॉटरी पद्धतीने नावे काढली जातील. शिवाय उपलब्ध जागांएवढी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कालावधी मिळेल. त्यानंतरही जागा शिल्लक असल्याच प्रतीक्षा यादीचा विचार होईल. ज्यांची नावे निश्चित झाली, त्यांना पडताळणी समितीकडून मूळ कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. त्यानंतर समितीकडून मिळालेले पत्र घेऊन पालकांनी संबंधित शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी होणार नाही.

arrow 2

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा