सोलापूर : थंडी कमी झाल्यानंतर उन्हाचा कडाका सुरू होईल व निर्यातीला चालना मिळेल, या अपेक्षेने राज्यातील ४३ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. दोन वर्षांच्या कोरोनाच्या प्रभावात युवक शेतकरीही द्राक्ष शेतीला जोडले असले तरी विक्रीसाठी देशभरात नेटवर्क तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या द्राक्ष निर्यातीला म्हणावा. तितका वेग आला नसला तरी गुणवत्तेचा माल तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
महाराष्ट्रातून विशेषतः नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत निर्यातक्षम गुणवत्तेची द्राक्षे पिकवली जातात. यामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून ३५ हजार शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल सांगली जिल्ह्यातील ६ हजार शेतकऱ्यांची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या प्रभावानंतर तरुणवर्ग द्राक्ष शेतीला जोडला असल्याने निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी कल वाढला असल्याचे सांगण्यात आले. सध्याचा थंडीचा कालावधी कमी
निर्यातीचा चढता आलेख
२०१८-१९ मध्ये ३५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली; मात्र १२ हजार शेतकऱ्याची एक लाख ९५ हजार मे. टन, १९-२० मध्ये ३८ शेतकऱ्यांची नोंदणी व दोन लाख १० हजार मे. टन, २०-२१ मध्ये ४५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी व १३०० शेतकऱ्याची दोन लाख ४६ हजार मे. टन द्राक्ष निर्यात झाली होती..
निर्यातीतून राज्यात दरवर्षी २२०० ते २३०० कोटी रुपये मिळतात निर्यातीच्या निमित्ताने गुणवत्तेची द्राक्षं तयार होतील, निर्यात नाही झाली तरी विविध राज्यांत शेतकऱ्यांनी थेट दलाल विरहित द्राक्ष बाजार शोधला पाहिजे. किमान आधारभूत किंमत ठरविण्याचा निर्णय चांगला आहे; मात्र एकीने शेतकऱ्यांनी नेटवर्क तयार केले पाहिजे. – गोविंद हांडे, राज्य निर्यात सल्लागार
Onion Rates Today; आजचे कांदा बाजार भाव 12/01/2022