Pune Ring Road: रिंगरोडसाठीच्या भूसंपादनातून शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 348 कोटी; जमिनीचे दर निश्चित


Last Updated on January 21, 2023 by Piyush

Pune Ring Road : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित रिंग रोडसाठी आवश्यक ४ तालुक्यांतील ३२ गावांतील ६१८.८० हेक्टर जमिनीचे अंतिम दर निश्चित करण्यात आले असून यातून २ हजार ३४८ कोटी रुपयांपर्यंत मोबदला जमीनधारकांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून पूर्व व पश्चिम असे दोन मार्ग होणार आहेत. पश्चिम रिंगरोडसाठी मावळ तालुक्यातील परंदवाडी, धामणे, उर्से, पाचाणे, बेबडओहोळ, चांदखेड या ६ गावांतील, मुळशी तालुक्यातील कासारआंबोली, अंबडवेट, कातवडी, घोटवडे, मोतेरेवाडी, जवळ, रिहे, पिंपळोली, केमेसेवाडी, उरावडे, पडळघरवाडी, आंबेगाव, मारणेवाडी, मुठे या १४ गावांतील, हवेली तालुक्यातील बहुली, भगतवाडी, मोरदरवाडी, मांडवी बु., सांगरूण, खामगाव मावळ, कल्याण, वरदाडे, रहाटवडे, थोपटेवाडी या १० तर भोर तालुक्यातील रांजे व कुसगाव या २ अशा ३२ गावांतील खासगी जमिनीचे संपादन सुरु आहे.

कोरोना कालावधीत या सर्व ३२ गावांत संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख, मोजणी निरीक्षक यांनी संबंधित तलाठी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी केली.

arrow

भूसंपादन होणाऱ्या जिल्ह्यातील गावांची आणि शेतकऱ्यांचे नावे पाहण्यासाठी येथे क्लीक करा

त्यानुसार नगररचना विभागाने प्राथमिक मूल्यांकन केले आहे. या जमिनीवर प्रत्यक्षात असलेले निवासी, व्यावसायिक बांधकामे, झाडे यांची माहिती घेऊन याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय मूल्यांकन निश्चिती समितीसमोर ठेवण्यात आली. त्यानुसार समितीने सर्व तरतुदी लक्षात घेत अंतिम दर निश्चित केले आहेत. अंतिम दर हे ६१८.८० ठरले आहेत.

बाधित शेतकऱ्यांना कायद्यानुसार योग्य मोबदला मिळेल याची खात्री करून अंतिम दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी जमीन देण्यास संमतिपत्रे देणाऱ्या खातेदारांना २५ टक्के अधिक रक्कम मिळणार असल्याने खातेदारांनी संमतिपत्रे देऊन प्रकल्पाला गती देण्यासाठी सहकार्य करावे. – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.

भूसंपादन होणाऱ्या जिल्ह्यातील गावांची आणि शेतकऱ्यांचे नावे पाहण्यासाठी येथे क्लीक करा