शेतकऱ्याची कमाल! पहिल्या हंगामात सात टन सीताफळाचे उत्पादन


Last Updated on December 19, 2022 by Piyush

जालना : माहेरी असल्यापासूनच शेतीची आवड असल्याने सासरीदेखील ती आवड कुटुंबातील सर्वांनी जोपासण्यासाठी प्रेरणा दिली. शेतीत काही तरी नवीन करावे या हेतूने कमी पाण्यावर येणारी सीताफळाची बाग फुलविण्याची मनीषा मनात होती, ती आज पूर्ण झाली असून, पहिल्याच हंगामात सात टन सीताफळाचे उत्पादन होऊन साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याचे महिला शेतकऱ्याने सांगितले.

सुषमा राधाकिशन कड यांचे या जाफराबाद तालुक्यातील पिंपळगाव कड येथील रहिवासी आहेत. एक कष्टकरी शेतकरी कुटुंब म्हणून हा परिवार या परिसरात ओळखला जातो. परंपरागत शेती करण्याऐवजी शेती करताना काहीतरी वेगळे आणि नवीन केले पाहिजे या इच्छेतूनच बार्शी तालुक्यातील गोरमाळा येथून एनएमके या जातीच्या सीताफळाची

कलम आणून ती चार एकरांत लावली. आठ बाय १६ या अंतराने या सीताफळांच्या झाडांची लागवड केली. त्यातून गेले दोन वर्ष वेगवेगळी आंतरपिकेही घेतली.

चार वर्षांच्या परिश्रमानंतर यंदा सीताफळ झाडांना लगडली. तोड केल्यावर सहा दिवसांनी ते खाण्यासाठी योग्य आणि गोड, तसेच गरेदार होत असल्याची माहिती सुषमा कड यांनी सांगितले. यंदा पहिलाच हंगाम असल्याने सात टन उत्पादन मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

शेती ही आपल्या भारतीयांची सर्वात मोठे हक्काचे उत्पादन देणारी काळी आई आहे. त्यात जेवढे जास्त परिश्रम घ्याल तेवढे चांगले उत्पादन मिळते. परंतु, हे करीत असताना शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी संयम पाळला पाहिजे. सीताफळाप्रमाणेच आपण याआधी उसाची यशस्वी लागवड केली होती. भविष्यात ही सीताफळाची बाग आमच्यासाठी वरदान ठरेल, हा विश्वास आहे.- सुषमा राधाकिसन कड, पिपळगाव, कड.

वाचा : कापसाच्या भावात अद्याप सुधारणा नाहीच