Last Updated on November 24, 2022 by Piyush
लातूर : परतीच्या पावसामुळे शेत पिकाचे मोठे नुकसान झाले असून, सोयाबीनचे भाव गडगडले आहेत. पेरणी, तसेच काढणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये, तारण योजनेत सोयाबीन अथवा अन्य शेतमाल ठेवून कर्ज घ्यावे. भाव आल्यानंतर सोयाबीनची विक्री करावी, असा सल्ला शेती व्यवसायाशी संबंधित तज्ज्ञांनी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे इतर पिकांच्या तुलनेत सर्वाधिक क्षेत्र आहे. ऊस पिकापेक्षा जास्त सोयाबीनचे क्षेत्र आहे; परंतु परतीच्या पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
काय आहे शेतमाल तारण योजना…
तारण योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदरात कर्ज मिळते. सहा महिन्यांच्या मुदतीत सोयाबीन पिकावर ही योजना लातूर बाजार समितीने सुरु केली.
१८० दिवसांत परतफेड…….
सोयाबीन पीक तारण योजनेत पिकावर सहा टक्के व्याजदरात ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळते. त्यानंतर सहा महिन्यांत विक्री करून परतफेड करावी लागते.
सहा महिन्याला सहा टक्के व्याज ….
शेतमाल तारण योजनेमध्ये सहा महिन्यांसाठी सहा टक्के व्याजदर आहे. जो शेतमाल तारण ठेवला आहे, त्याची ७५ टक्के रक्कम संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते.
कोणत्या पिकांना लागू?
शेतमाल तारण योजना लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच मुरुड उपबाजार समितीने लातूर तालुक्यात सुरु केलेली आहे. फक्त सोयाबीन .पिकासाठी तारण योजना सध्या आहे.
कोणत्या बाजार समितीत किती शेतकऱ्यांनी घेतला लाभ
मूग, उडीद, तूर, हरभरा आदी पिकांसाठी तारण योजना असते. मात्र, लातूर आणि मुरुड बाजार समितीने सोयाबीन पिकासाठी तारण योजना सुरु केली आहे. या योजनेचा शेतकरी लाभ घेत आहेत. तारण योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेल्या शेतमालावर ६ टक्के व्याजदराने ७५ टक्के रक्कम दिली जाते. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर शेतमाल विक्री करून घेतलेल्या रकमेची शेतकऱ्यांना परतफेड करावी लागते.
तारण योजनेचा लाभ घ्या
सोयाबीन शेतमाल तारण ठेवण्यासाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सोय उपलब्ध केली आहे. मुरुड उपबाजार समितीतही या तारण योजनेचा प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांना गरजेनुसार या योजनेचा लाभ घेता येईल. लातूर बाजार समिती, सचिव.
वाचा : कांदा रोपांना आला सोन्याचा भाव; मोजा एकरी 50 हजार