नाशिक जिल्ह्यात डाळिंब प्रकल्प


Last Updated on December 21, 2022 by Vaibhav

नवी दिल्ली: पंतप्रधान कृषीधन योजनेंतर्गत डाळिंब आधारित उत्पादनांच्या मूल्यवर्धन प्रक्रियेसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची निवड केली आहे. त्यात नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि सांगलीचा समावेश आहे. सोलापुरात डाळिंब फलोत्पादन क्लस्टर उभारण्यात येणार आहे.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी लोकसभेत भाजप खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक- निंबाळकर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, संपूर्ण देशात ३.१५ लाख मेट्रिक टन डाळिंबांचे उत्पादन होते, त्यापैकी १.६६ लाख मेट्रिक टन डाळिंबाचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. केवळ सातारा जिल्ह्यात ३२ हजार मेट्रिक टन डाळिंबांचे उत्पादन होत आहे.

हेही वाचा: मेथी अवघी ५ रुपये जुडी; शेतकरी झाले हवालदिल