Land Acquisition: महानगरातील गावे होणार स्मार्ट! टीपी स्कीममधून पुणे जिल्ह्यातील गावांमधील जमिनीचे होणारा भूसंपादन


Last Updated on January 19, 2023 by Piyush

Land Acquisition : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) (PMRDA TP Scheme) माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गावांचे रूप बदलण्यात येणार आहे. गावांचा विकास करण्यासाठी पीएमआरडीए टीपी (टॉवन प्लॅनिंग) स्कीम राबवत आहे. सद्य:स्थितीत म्हाळुंगे माण या टीपी स्कीमला मंजुरी मिळाली आहे, तर अजून पाच टीपी स्कीम पीएमआरडीए राबवणार आहे. त्यामधून तब्बल १ हजार हेक्टर जमिनीचा विकास होऊन गाव-खेडीही स्मार्ट होणार आहेत.

पुणे शहराला लागून असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये सोयी सुविधा पुरवण्यासाठी पीएमआरडीएच्यावतीने म्हाळुंगे-माण ही टीपी स्कीम राबवण्यात येणार आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये २५० हेक्टर जमीन संपादित करून त्याचा विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये चार रस्त्यांच्या कामास सुरुवात झाली आहे.

पीएमआरडीएच्या वतीने पुणे जिल्ह्यात ३२ टीपी स्कीम राबवण्यात येणार आहे. त्यापैकी सहा टीपी स्कीम सध्या कार्यान्वित आहेत. म्हाळुंगे-माण टीपी स्कीमला मंजुरी मिळाली आहे, तर इतर पाच टीपी स्कीम मार्च महिन्यामध्ये राज्य शासनाकडे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये वडाचीवाडी, अवताडे- हांडेवाडी, होळकरवाडी (५), मांजरी कोलवडी या टीपी स्कीम राबवण्यात येणार आहेत.

arrow

भूसंपादन होणाऱ्या जिल्ह्यातील गावांची आणि शेतकऱ्यांचे नावे पाहण्यासाठी येथे क्लीक करा

म्हाळुंगे माण या टीपी स्कीममध्ये सुरुवातीला काही अडचणी आल्या. टीपी स्कीमच्या मंजुरीस उशीर झाला. अडचणी पुन्हा येऊ नये, यासाठी पीएमआरडीएने सर्व बाबींचा अभ्यास करून मार्च अखेर पाच टीपी स्कीमचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.

काय मिळणार सोयी-सुविधा?

टीपी स्कीमअंतर्गत पुणे जिल्ह्यातील गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्या जमिनीवर विकासकामे करण्यात येणार आहेत. रस्ते, पूल, उड्डाणपूल यांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासोबतच ड्रेनेजलाईन, पाणीपुरवठा, उद्याने, क्रीडांगणे विकसित करण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत या भागांमध्ये लोकसंख्या कमी असली, तरी टीपी स्कीम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विकसित भागांमध्ये सुमारे तीन लाखांहून अधिक लोकसंख्या राहू शकणार आहे.

arrow

भूसंपादन होणाऱ्या जिल्ह्यातील गावांची आणि शेतकऱ्यांचे नावे पाहण्यासाठी येथे क्लीक करा

१० टक्के जागेतून निधी उपलब्ध

म्हाळुंगे माण टीपी स्कीमसाठी ५ हजार ८०० खातेदारांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली आहे. ही जमीन सुमारे २५० हेक्टर आहे. त्यातील १२५ हेक्टर जमीन पुन्हा दिली जाणार आहे. स्कीममध्ये जागा संपादित केल्यानंतर १० टक्के जागा ही प्रशासनाला मिळते. त्याचा व्यावसायिक वापर करून निधी मिळवता येतो.

मांजरी कोलवडीसाठी ‘अमृत’

सहा टीपी स्कीमपेंकी मांजरी कोलवडी या भागामध्ये पाणीपुरवठ्याची सोय अपुरी आहे. त्यामुळे याठिकाणी विकासकामे करताना तसेच स्कीम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची अडचण येणार आहे. त्यासाठी शासनाची अमृत योजना राबवण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे.

arrow

भूसंपादन होणाऱ्या जिल्ह्यातील गावांची आणि शेतकऱ्यांचे नावे पाहण्यासाठी येथे क्लीक करा