Pik Vima : शासनाने विमा कंपन्यांना ७२५ कोटी दिल्यानं ५० हजार शेतकऱ्यांना मिळणार भरपाई


Last Updated on January 17, 2023 by Piyush

Pik Vima : शासनाने ७२४ कोटी ५१ लाख ४६ हजार ८०९ रुपये विमा कंपन्यांना दिल्याने आता खरीप पिकांच्या विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ५० हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ६६२ शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक विमा भरला होता. त्यापैकी १ लाख ९ हजार ५९३ शेतकऱ्यांना १०४ कोटी १७ लाख ३४ हजार रुपये विमा कंपनीकडून जमा करण्यात आले आहेत.

उर्वरित पैकी मंजूर करण्यात आलेल्या १६ हजार ४२ शेतकऱ्यांचे १२ कोटी ४७ लाख रुपये अद्याप विमा कंपनीने दिले नाहीत. याशिवाय नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या व विमा कंपनीकडून पात्र ठरविलेल्या २५ हजार ६३५ शेतकऱ्यांची विमा निश्चिती झालेली नाही. विमा निश्चिती झालेले व पात्र ठरलेल्या ४१ हजार शेतकऱ्यांना शासनाने विमा कंपनीकडे पैसे जमा केल्याने पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय कृषी विमा कंपनीच्या समन्वयातून भारतीय कृषी विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ट जनरल इन्शुरन्स, बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या ५ विमा कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांना शासनाने ७२४ कोटी ५२ लाख रुपये। जमा केले आहेत.

GR डाउनलोड करा व आपले नाव यादीत शोध

सहा महिने झाले तरी पैसे नाही

जून – जुलै महिन्यात सुरु झालेल्या पावसाने ऑक्टोबर महिन्यापर्यंत विश्रांती घेतली नाही. पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. बार्शी, अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना शासनाकडून पीक नुकसानीचे पैसे मिळाले असले तरी इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. पीक नुकसान होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला. मात्र पैसे काही मिळाले नाहीत. विमा नुकसानीचेही असेच झाले आहे.

पावसाच्या संततधारेने पिके पाण्यात गेली. पिकांचे पंचनामे करून चार महिने होऊन गेले आहेत. मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन हाती लागले नाही. शासन व विमा कंपनीकडून पैसे मिळाले नाहीत. मदत ही त्याच वेळी मिळाली असती तर रब्बी हंगामातील पिकांसाठी खर्च करता आली असती. आता तरी वेळेवर ही प्रक्रिया करण्यात यावी. – अभिजित भोसले, शेतकरी, कौठाळी.

GR डाउनलोड करा व आपले नाव यादीत शोध