Last updated on January 10th, 2022 at 12:51 pm
अम्मान: जॉर्डन देशाच्या संसदेत शाब्दिक बाचाबाचीने सुरू झालेल्या खासदारांचा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. समानतेच्या अधिकारावरून घटनादुरुस्तीसंदर्भातील एका प्रस्तावावर चर्चा सुरू असताना वादग्रस्त वक्तव्यामुळे या वादाला सुरुवात झाली. आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल संबंधित खासदाराने माफी मागावी, यासाठी विरोधी पक्षाचे खासदाराही अडून राहिले. शब्दाला शब्द वाढला तसाच काही सदस्यांना संताप अनावर झाला. पाहता पाहता खासदार एकमेकांना भिडले. धक्काबुक्की, लाथाबुक्क्यांनी सभागृहात गदारोळ माजला.
इतर खासदारांनीही या वादात उडी घेत हात साफ करून घेतल्याने तणाव वाढला. लोकशाहीच्या मंदिरातील हा सर्व राडा राष्ट्रीय प्रसारमाध्यमांवर थेट प्रक्षेपणामुळे देशवासीयांनीही पाहिला. सोशल मीडियावरही या गदारोळाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले.
सुदैवाने या गदारोळात कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, लोकप्रतिनिधींची अशा प्रकारची वर्तणूक टीकेचा विषय ठरली आहे. असा प्रकार देशाच्या प्रतिष्ठेसाठी घातक असून, देशवासीयांना कदापिही मान्य नाही, अशी टीका खासदार खलिल आतियेह यांनी केली आहे.
कोरोनाचा कायमस्वरूपी नायनाट शक्य!