वातावरणात अचानक मोठा बदल; ‘या’ जिल्ह्यात चार दिवस पडणार अवकाळी पाऊस..! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज


Last Updated on January 25, 2023 by Piyush

Panjabrao Dakh Havaman Andaj : आज राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पाऊसही सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे.

याशिवाय नाशिकमध्येही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र, परभणीचे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी तीन ते चार दिवस अगोदरच राज्यात हवामान बदलेल, असा अंदाज वर्तवला होता.

याचा अर्थ डख यांचा हवामानाचा अंदाज आता खरा ठरत आहे. त्यामुळे आज पंजाब राव यांनी दिलेला हवामानातील सुधारित अंदाज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजानुसार 25 तारखेपासून नाशिक व लगतच्या जिल्ह्यांत हवामान बिघडण्यास सुरुवात होईल. आज नाशिक जिल्ह्यातही दिवसभर ढगाळ हवामान होते तर अहमदनगरमध्येही काही ठिकाणी विशेषतः राहुरी तालुक्यात रिमझिम पाऊस झाला.

वाचा : शेतात किंवा घरावर मोबाईल टॉवर बसवा आणि महिना 50 ते 70 हजार कमवा 

याशिवाय 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या सुधारित हवामान अंदाजानुसार 26 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान नाशिक आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, परिसरात ढगाळ वातावरण राहील. याच काळात मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.

तर, पश्चिम विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो आणि या पावसाची तीव्रता पश्चिम विदर्भात अधिक असेल असे डख यांनी नमूद केले.

पुढील तीन दिवस पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अर्थात, पंजाबराव डख यांनी आतापर्यंत वर्तवलेला हवामानाचा अंदाज खरा ठरला असून उद्यापासून 28 जानेवारीपर्यंत त्यांनी सांगितलेल्या भागात पाऊस झाल्यास रब्बी हंगामाच्या वाढत्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

वाचा : शेतात किंवा घरावर मोबाईल टॉवर बसवा आणि महिना 50 ते 70 हजार कमवा