Onion Inflation: पाकिस्तानात कांद्याचे दर 500 टक्के वाढले, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले


Last Updated on January 12, 2023 by Piyush

Onion Inflation: पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. येथील लोकांची गहू आणि पीठासाठी मारामार होत आहे. येथे महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. जानेवारी २०२२ मध्ये महागाई १३ टक्केच्या दराने वाढत होती, सध्या ती २५ टक्केच्या दराने वाढत आहे.

पाकिस्तानात (Pakistan) मागील आलेल्या पुरानंतर व आर्थिक स्थिती बिकट झाल्याने तेथील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानमध्ये टोमॅटो 500 रुपये किलो आणि कांदा २२० रुपये (Onion Rate) किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना टोमॅटो कांदा खरेदी करणे कठीण होत आहे.

पाकवर संकट ओढावल्याने सौदी अरेबिया, रशिया, आदी देशांनी पाकला मदतीचा हात पुढे केला आहे. सौदी अरेबियाने पाकमधील त्यांची गुंतवणूक १० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविली आहे. त्याचवेळी गव्हाने भरलेली दोन रशियन जहाजे कराची बंदरात पोहोचली आहेत. खाद्यपदार्थाच्या वाढत्या किमतीविरोधात पाकमध्ये निदर्शने होत आहेत.

onion

केवळ तीन आठवडे…

पाकिस्तान केवळ तीन आठवड्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंची आयात करू शकणार आहे. देशात मूलभूत गोष्टींचा तुटवडा आहे. त्यांची अवस्था श्रीलंकेसारखीच असू शकते, असे दिसते. डॉलरच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडण्याची भीती पाकिस्तानातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

arrow

महाराष्ट्रात कांदा दरात मोठी वाढ; वाचा येथे क्लीक करून