कांदा पुन्हा 14 रुपयांनी घसरला..! आज एपीएमसीमध्ये मिळतोय इतका रुपये दर


Last Updated on November 24, 2022 by Piyush

नवी मुंबई : मुंबईमध्येही कांद्याचे दर झपाट्याने घसरू लागले आहेत. १ महिन्यापूर्वी बाजार समितीमध्ये २४ ते ३४ रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा १० ते २० रुपये किलोवर आला आहे. टोमॅटोचे दर १५ ते ३० वरून ८ ते १४ रुपयांवर आले आहेत.

परतीच्या पावसामुळे चाळीतील कांदा भिजल्याने शिल्लक कांद्याला चांगला बाजारभाव मिळू लागला होता. मुंबई बाजार समितीमध्ये ऑक्टोबरमध्ये २४ ते ३४ रुपये दर मिळू लागला होता. नवीन कांदा मार्केटमध्ये येण्यास विलंब असल्यामुळे कांदा दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती; परंतु पुणे, नाशिक, अहमदनगरमधून आवक वाढल्याने दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

बुधवारी मुंबईमध्ये कांद्याला १० ते २० रुपये किलो असा दर मिळाला. गत महिन्याच्या तुलनेमध्ये तब्बल १४ रुपयांनी दर घसरला आहे. किरकोळ मार्केटमध्येही कांद्याचे दर ४५ वरून ३० वर आले आहेत. दर घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.

graf

बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवकही वाढली आहे. बुधवारी तब्बल २६८ टन टोमॅटोची आवक झाली आहे. एक महिन्यापूर्वी टोमॅटो १५ ते ३० रुपये किलो दराने विकला जात होता. बुधवारी हे दर ८ ते १४ रुपयांवर आले आहेत.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/11/2022
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल8055110020001550
खेड-चाकणक्विंटल200100015001250
साताराक्विंटल173100020001500
लासलगावलालक्विंटल14176117611761
पुणेलोकलक्विंटल1109960019001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल20110018001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल4453001600950
वाईलोकलक्विंटल18100021001550
कामठीलोकलक्विंटल20120016001400
येवलाउन्हाळीक्विंटल600030018111200
लासलगावउन्हाळीक्विंटल799560017301470
चांदवडउन्हाळीक्विंटल320040021001170
मनमाडउन्हाळीक्विंटल360040015961000

दुबईतील जानी विश्वनाथन यांची राहीबाई यांच्या बीज बँकेला भेट