Last Updated on December 27, 2022 by Vaibhav
नाशिक : नवीन घर घ्यायचे म्हटले की सर्वात अगोदर पैशाची तजवीज करावी लागते. बँकेचे कर्ज आणि बांधकाम व्यावसायिक देणार असलेल्या घराचा दर्जा याबाबत मध्यमवर्गीय नागरिकांना चिंता सतावत असते. मात्र, यावर • मात करीत ए. सी. जैन यांच्या अर्पण विहार या गृह प्रकल्पाने ‘पैसे देणारं घर’ ही टॅग लाइन शेअर करीत नागरिकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
या प्रकल्पात एकदा घर बुक केल्यानंतर पझेशनपर्यंत दरमहा दहा हजार रुपये मिळणार असल्यामुळे नाशिक शहरात सर्वांच्याच तोंडी ‘पैसे देणारं घर’ या प्रकल्पाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी दि. २६ ते २८ डिसेंबर या तीन दिवसांत घर बुक करावे लागणार आहे.
अर्पण विहार हा प्रकल्प हिरावाडी, पंचवटी येथे स्थित असून, फक्त दोन दिवसांत जवळपास शंभर जणांचे गृहस्वप्न पूर्ण झाले आहे. अर्पण विहार या प्रकल्पात उत्तम दर्जाचे बांधकाम, सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी, मंदिरापासून ते सिनिअर सिटीझन एरियापर्यंत मोकळा परिसर, सायकल ट्रॅक, लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र मैदान, बॉक्स क्रिकेटपासून ग्रीन जिमपर्यंत प्रत्येक गटाचा विचार करून सर्वोत्तम अॅम्नेटिज देण्यात आलेल्या आहेत. दरमहा दहा हजार रुपये मिळविण्याची हमी असून, यासाठी २६ ते २८ डिसेंबर २०२२ या काळातच ग्राहकांना घर बुक करण्याची संधी आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पाचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, बांधकामाचा दर्जा पाहण्यासाठी साइटला भेट देण्याचे आवाहन ए. सी. जैन बिल्डर्सच्या संचालकांनी केले आहे. बुकिंगसाठी येताना पॅन कार्ड, आधारकार्डची झेरॉक्स प्रत आणावी किंवा वितराग बंगला, गोपाळनगर, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड (७७७०००५८२८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: उपसरपंच पदाच्या निवडीसाठी इच्छुकांचे आतापासूनच लॉबिंग !