नाशिक बाजार समितीची निवडणूक पुन्हा लांबणीवर

Last Updated on December 19, 2022 by Vaibhav

१५ मार्चपर्यंत स्थगिती : अन्य बाजार समितींमध्ये निवडणुकीची धामधूम

नाशिक : पुढील महिन्यात होऊ घातलेली नाशिक बाजार समितीची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून, उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या कारणास्तव १५ मार्चपर्यंत निवडणुकीला स्थगिती दिली आहे. नाशिक बाजार समितीला स्थगिती मिळाली असली तरी, जिल्ह्यातील अन्य तेरा बाजार समित्यांच्या निवडणुका मात्र वेळेवरच होणार आहेत.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने गेल्या दोन वर्षे कोरोनामुळे मुदत संपलेल्या राज्यातील बाजार समित्यांची निवडणूक घेण्याचे आदेश सप्टेंबर महिन्यात दिले होते. २९ जानेवारी २०१३ रोजी बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी मतदान घेण्याचे ठरवून त्याअगोदर मतदार याद्या तयार करणे, प्रारूप यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविणे, त्याची सुनावणी घेणे व अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम जिल्हा उपनिबंधकांच्या अखत्यारित करण्यात आले होते.

नाशिक जिल्ह्यातील नाशिकसह चौदा बाजार समित्यांचा कार्यक्रम घोषित झाल्याने इच्छुकांनी त्यादृष्टीने नाशिक : पुढील महिन्यात होऊ घातलेली नाशिक बाजार समितीची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून, उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या कारणास्तव १५ मार्चपर्यंत निवडणुकीला स्थगिती दिली आहे. नाशिक बाजार समितीला स्थगिती मिळाली असली तरी, जिल्ह्यातील अन्य तेरा बाजार समित्यांच्या निवडणुका मात्र वेळेवरच होणार आहेत.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने गेल्या दोन वर्षे कोरोनामुळे मुदत संपलेल्या राज्यातील बाजार समित्यांची निवडणूक घेण्याचे आदेश सप्टेंबर महिन्यात दिले होते. २९ जानेवारी २०१३ रोजी बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी मतदान घेण्याचे ठरवून त्याअगोदर मतदार याद्या तयार करणे, प्रारूप यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविणे, त्याची सुनावणी घेणे व अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम जिल्हा उपनिबंधकांच्या अखत्यारित करण्यात आले होते.

१- नाशिक जिल्ह्यातील देवळा, घोटी, मालेगाव, दिंडोरी, लासलगाव, नाशिक, सुरगाणा, नांदगाव, सिन्नर, पिंपळगाव, चांदवड, मनमाड, येवला व कळवण अशा चौदा बाजार समित्यांची मतदारांची अंतिम यादी ७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. येत्या शुक्रवार (दि. २३) पासून नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहे.

२- आता नाशिक, त्र्यंबकेश्वर व पेठ या तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती मिळाल्यामुळे नाशिक वगळून अन्य तेरा बाजार समित्यांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे.

राजकारण भोवले

नाशिक बाजार समितीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी देविदास पिंगळे व शिवाजी चुंभळे यांच्यात चढाओढ सुरू असून, पिंगळे यांनी यापूर्वीच न्यायालयात धाव घेऊन बाजार समितीच्या निवडणुका घेण्याची विनंती केली आहे. तर चुंभळे यांच्याकडून निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या दोन्ही नेत्यांच्या राजकारणामुळे बाजार समितीची फरपट होत आहे.

हेही वाचा: कुक्कुट खाद्यात होणार आता प्रथिनेयुक्त अळ्यांचा वापर