मुलांची नावे बॉम्ब, बंदूक, सॅटेलाइट अशी ठेवा!


Last Updated on January 6, 2023 by Vaibhav

प्योंगयांग उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा आपल्या सनकी स्वभावासाठी जगभरात कुप्रसिद्ध आहे. किम जोंग वेळोवेळी असे काही आदेश लागू करतो वाटेल. की, त्यामुळे तो देशवासीयांच्याच नव्हे तर जगाच्याही टीकेचे लक्ष्य ठरतो. आता किमने नवे फर्मान सोडले आहे. आपल्या ठी देशातील मुलांची नावे कोमल, मवाळ अशी असता कामा नयेत.

त्याऐवजी बंदूक, बॉम्ब, क्षेपणास्त्र अशी ठेवली जावीत, असे हे फर्मान आहे. हुकूमशहा किम जोंग उनची इच्छा आहे की, उत्तर कोरियातील मुलांची नावे बॉम्ब, बंदूक आणि क्षेपणास्त्र अशा शब्दांवर आधारित असावीत. किमचे असे म्हणणे आहे

की, अशी नावे ठेवल्याने मुलांच्या नावामधून मवाळपणाऐवजी प्रखर देशभक्तीची भावना दिसून येईल. त्यासाठी किमने लहान मुलांची नाजूक आणि मवाळ अर्थ असलेली नावे बदलून चोंग इल (बंदूक), चुंग सिम (निष्ठा), पोक इल (बॉम्ब) आणि उई साँग (उपग्रह) अशी ठेवण्यात यावीत, असे आदेश दिले आहेत.

म्हणजे या देशातील ज्या मुलांची नावे प्रेम, सौंदर्य आणि अशा सौम्य भावनांशी निगडित आहेत, त्या मुलांची नावे बदलणे बंधनकारक आहे. किमच्या या नव्या आदेशामुळे उत्तर कोरियातील लोक संतप्त आहेत. कारण स्थानिक सरकारी अधिकारी त्यांना मुलांची नावे बदलण्यास सांगत आहेत. गेल्या महिन्यात नोटीस दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली होती, त्यानंतर नागरिकांवर मुलांची नावे बदलण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे.

हेही वाचा: खतरनाक ‘या’ महिलेच्या बँक खात्यात जमा झाले २७० कोटी रुपये