घरांच्या विक्रीत मुंबईपुण्याचा निम्मा वाटा । 2 BHK Flat in Mumbai

मुंबई : देशातील घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ३६ टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये एक लाख २० हजार घरांची विक्री झाली आणि विशेष म्हणजे यातील निम्म्याहून अधिक घरांची विक्री मुंबई (2 bhk flat in mumbai) आणि पुण्यात (2 bhk flat in pune) झाली आहे.

देशातील प्रमुख महानगरांतील घरांच्या विक्रीचा अहवाल ‘अनारॉक समूहा’ने जाहीर केला. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या सात महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, यंदा जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत एकूण १,२०,२८० घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षातील याच तिमाहीत घरांची विक्री ८८,२३० इतकी होती. आता त्यात ३६ टक्के वाढ नोंदविण्यात आली. देशात मुंबईमध्ये सर्वाधिक ३८,५०० घरांची विक्री झाली आहे. त्या खालोखाल पुण्यात २२,८८० घरांची विक्री झाली. देशातील एकूण घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. घरांच्या विक्रीत मुंबईत वार्षिक ४६ टक्के, तर पुण्यात वार्षिक ६३ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

देशात तिसऱ्या तिमाहीत एकूण १,१६,२२० नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. नवीन घरांच्या पुरवठ्यातही मुंबई आघाडीवर आहे. तिसऱ्या तिमाहीत मुंबईमध्ये ३६,२५० नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात केवळ एक टक्का वाढ झाली.

याच वेळी हैदराबादमध्ये २४,९०० नवीन घरांचा पुरवठा झाला असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल ६० टक्के वाढ नोंदविण्यात आली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाचा : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ, आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज । Mhada Lotetry Pune

देशातील घरांची विक्री (जुलै ते सप्टेंबर २०२३)

● मुंबई : ३८,५००
● पुणे : २२,८८
● बंगळुरू : १६,३९५
● हैदराबाद : १६,३७५
● दिल्ली : १५,८६५
● कोलकता : ५,३२०
● चेन्नई : ४,९४०
● एकूण : १,२०,२८०

अहवालातील ठळक मुद्दे

● घरांच्या किमतीत सरासरी ११ टक्क्यांची वाढ
● सरासरी प्रति चौरस फूट दर ६,१०५ रुपयांवरून ६,८०० रुपयांवर
● ४० ते ८० लाख रुपयांच्या घरांचा सर्वाधिक २८ टक्के पुरवठा
● ८० लाख ते दीड कोटी रुपयांच्या घरांचा २७ टक्के पुरवठा
● दीड कोटी रुपयांवरील घरांचा २७ टक्के पुरवठा

वाचा : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी..! मुंबई महानगरात सरकारी लॉटरीत घर जिंकण्याची संधी | Cidco Lottery

Leave a Comment