Last updated on January 8th, 2022 at 11:10 pm
मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना आणि ओमिक्रॉन या नवीन प्रकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाइन शाळा बंद करूनही ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे. हा निर्णय फक्त मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील शाळांसाठी आहे.
मुंबईतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या फैलावामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मीटर लावण्यापूर्वीच पाच हजाराचे बिल; वीज वितरणचा भोंगळ कारभार