Bhiwani Mining Accident: भिवानीतील दादम खाण परिसरात डोंगर घसरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली सुमारे 15-20 लोक आणि 10 वाहने दबली आहेत. अद्याप मृत्यूची अधिकृत पुष्टी नाही. हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जण जखमी झाले आहेत.
कृषी मंत्री जेपी दलाल भूस्खलनाच्या ठिकाणी पोहोचले
अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले कृषी मंत्री जेपी दलाल म्हणाले की, काही लोकांचा मृत्यू झाला आहे, मात्र मी आत्ताच अचूक आकडे देऊ शकत नाही. डॉक्टरांची टीम आली आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. बचावकार्य सुरू करण्यात आले असून पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही जखमींना हिसार येथे नेण्यात येत आहे.
कारणे माहीत नाहीत
खाणकामात वापरल्या जाणाऱ्या पॉपलँड आणि इतर अनेक मशिन्सही ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आहेत. डोंगर घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. डोंगर स्वतःहून घसरला की स्फोटामुळे ही दुर्घटना घडली, याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.
शुक्रवारपासूनच खाणकाम सुरू झाले
तोशाम प्रदेशातील खानक आणि दादममध्ये पर्वतीय उत्खनन मोठ्या प्रमाणावर केले जाते. प्रदूषणामुळे दोन महिन्यांपूर्वी खाणकामावर बंदी घालण्यात आली होती. एनजीटीने गुरुवारीच खाणकाम सुरू करण्यास परवानगी दिली होती. एनजीटीची परवानगी मिळाल्यानंतर शुक्रवारपासून खाणकाम सुरू करण्यात आले.
दोन महिन्यांपासून खाणकाम बंद असल्याने बांधकाम साहित्याचा तुटवडाही जाणवत होता. या टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग होण्याचीही शक्यता आहे.
कोल्हापुरच्या रिक्ष्यावाल्याची राज्यात चर्चा; अल्पवयीन मुलींना वेश्या…