पुणे : हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीमुळे हृदयावरील दाब वाढतो. परिणामी, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जातात. या ऋतूमध्ये वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सक्रीय व चांगली जीवनशैली अंगीकृत करून आपले आरोग्य जपावे. तसेच, नियमित तपासणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
युरोपियन जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका ३० टक्क्यांपर्यंत जास्त असतो. शहरातील रुग्णालयामध्ये उन्हाळ्यात ३० ते ५० वर्षे वयोगटातील ३० ते ४० टक्के एंजियोप्लास्टी करण्यात आली. मात्र, हिवाळ्यामध्ये ही संख्या वाढून ५० टक्क्यांपर्यंत नोंदवली जात असतात.
हिवाळ्यात तापमान कमी होण्यास सुरुवात होते. शरीरात बदल होऊ लागतात. शरीर थंड होऊन हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. या संकुचित रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर येण्यासाठी अधिक दाब द्यावा लागतो. अशा प्रकारे रुग्णाचा रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला की, हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता असते. हिवाळ्यात छातीत जंतूसंसर्ग होणे, हृदय गती वाढणे आणि रक्तदाब वाढणे, यासारख्या परिस्थितीमुळे हृदय गती बिघडू शकते. त्याचप्रमाणे थंडीच्या मोसमात रक्त घट्ट होऊ लागते. परिणामी, गुठळ्या सहजपणे तयार होऊ लागतात.
या गुठळ्या रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करतात. परिणामी, रुग्णांना स्ट्रोकचा सामना करावा लागतो. शरीराचे कमी तापमान, व्हिटॅमिन डीची कमी उपलब्धता आणि रक्तातील चिकटपणा वाढणे ही हिवाळ्यातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांची इतर कारणे आहेत. जीवनशैलीविषयक आजार, धूम्रपान, मद्यपान, उच्च-कॅलरीयुक्त आहाराची कमतरता व कमी पोषण आहार
यासारख्या जीवनामुळे हृदयविकाराची जोखीम वाढते. काही अभ्यासांनुसार, हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ५३ टक्क्यांनी वाढते. हिवाळ्यातील महिन्यांत वृद्ध लोक हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. कारण, त्यांना हायपोथर्मियाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उबदार कपड्यांचा वापर करून शरीराच्या उष्णता कायम ठेवण्याची गरज असते.
छातीत जळजळ तसेच एक विशेष प्रकारचा दाब आणि वेदना होत असतील, याशिवाय पाय सुजणे, जबड्यात दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अशा वेळी जास्त पाणी पिणे टाळावे. यापूर्वी हृदयविकार रुग्ण असाल तर डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करावे. उन्हात वेळ घालविण्याबरोबर व्यायामही आवश्यक आहे. हिवाळ्यातील सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळण्यासोबतच शरीर मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज देखील बनवते. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमताही वाढते.
सर्वाधिक हृदयविकाराचा झटका हिवाळ्यात का येतो? हिवाळ्यात तापमान कमी होण्यास सुरुवात होते, शरीर थंड होऊ लागते. रक्त घट्ट होऊ लागते. हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. या संकुचित रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर येण्यासाठी अधिक दाब द्यावा लागतो. अशा प्रकारे रुग्णाचा रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढला की, हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे घडतात.
हृदयविकाराची जोखीम कमी करण्याकरिता टाळता येणाऱ्या जोखमीच्या घटकांकडे लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, मद्यपान, धुम्रपान, तंबाखूसेवन, लठ्ठपणा यांचा समावेश आहे. त्यामुळे सक्रीय व चांगली जीवनशैली अंगीकृत करून आपले आरोग्य जपावे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचा त्रास ज्यांना आहे, त्यांनी यावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवावे.
यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वेळेवर औषधे, योग्य आहार व इतर काळजी घ्यावी. ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा वैद्यकीय इतिहास आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. चांगल्या जीवनशैलीचा पर्याय | निवडून आपण हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकतो. -डॉ. अभिजित पळशीकर, हृदयरोग तज्ज्ञ, सह्याद्री हॉस्पिटल्स, पुणे
काळजी घ्या ! 2022 च्या सुरुवातीला Corona ची तिसरी लाट निश्चित, तज्ज्ञांनी दिला इशारा