माजलगाव (जिल्हा बीड) : तालुक्यातील लवूळ येथे गेल्या महिनाभरापासून माकडे धुमाकूळ घालत आहेत. गावातीलकुत्र्याचे पिल्लू माकडांनी पाहिलेकी त्यांनाउचलून उंच ठिकाणावरून त्या पिलांना ढकलूनबळीघेत आहेत. या माकडांनी आतापर्यंत सुमारे 250 कुत्र्यांना मारले आहे. मात्र वनविभाग याकडे लक्ष देत नाही.
माजलगावपासून दहा किलोमीटर अंतरावर पाच हजार लोकसंख्येचे लवूळ गाव आहे. या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून ही माकडेकुत्र्यांची पिल्ले उचलून घेऊन जात आहेत. कुत्र्याची पिल्ले उचलून उंच झाड किंवाघरावरनेऊनफेकून देत आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, माकडांनी आतापर्यंत 250 हून अधिक पिल्लांना मारले आहे.
याबाबत ग्रामपंचायतीने धारूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असतातेकेवळ एकच दिवसआले. काही वेळ त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण माकडांना पकडता आले नाही म्हणून ते निघून गेले. तेव्हापासून ते गावात फिरकले नाहीत.
कुत्र्यांनी मारले होते वानराचे पिल्लू
काही दिवसांपूर्वी लवूळ गावात एका माकडाच्यापिल्लालाकुत्र्यानीकाही दिवसापूर्वी मारले होते.यामुळे रागाच्या भरात माकडे गावातील पिल्लांना मारत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अनेक जण जखमी
लवूळ गावातील सीताराम नायबल यांच्या पिल्लाला १५ दिवसांपूर्वी माकडाने उचलून नेले होते. नायबलने छतावर जाऊन पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता माकडे त्याच्या दिशेने धावली. यामध्ये नायबलछतावरुण पडला आणि त्याचा पाय मोडला. अनेक जण जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
आता लहान मुले टार्गेट
गावांतील पिल्लांची संख्या कमी झाल्याने आता माकडांचे लक्ष लहान मुलांकडे लागले आहे. संतराम शिंदे यांच्या आठ वर्षांच्या नातवाला माकडाने उचलूनपत्र्यावर नेलेहोते. नागरिकांनीमाकडावर दगड आणि लाठ्याउगारल्याने मुलाला सोडयन माकडाने पळ काढला. पंचायत समितीचे माजी सदस्य राधाकिसन सोनवणे यांनी सांगितले की, माकडे शाळकरी मुलांचा पाठलाग करतात आणि त्यांनी काही महिलांनाहीमारल्याच्याघटनाही घडलेल्या आहेत.
कुलगुरूंची निवड सरकारच्या शिफारशीने होणार; राज्यपालांच्या अधिकारांना सरकारची कात्री