जी-20 देशांत मतैक्यासाठी मोदींची भूमिका निर्णायक


Last Updated on November 22, 2022 by Vaibhav

अमेरिकेच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांकडून कौतुक

वॉशिंग्टन : बलाढ्य भारत आणि अमेरिका या लोकशाहीवादी देशांच्या संबंधांच्या इतिहासात २०२२ हे वर्ष ऐतिहसिक ठरले असून, आगामी २०२३ सालसुद्धा अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे प्रधान उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फायनर यांनी सोमवारी केले. याचवेळी जी-२० शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनावर सदस्य देशांमध्ये मतैक्य घडवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णायक भूमिका बजावली, असे कौतुकही त्यांनी केले.

वॉशिंग्टन येथे आयोजित भारतवंशीय अमेरिकन नागरिकांच्या कार्यक्रमाला जॉन फायनर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत व अमेरिकेच्या संबंधांना उजाळा दिला. ते म्हणाले की, अमेरिका व देशाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे जगभरात जबाबदारीचे ओझे प्रतिभावंत नेत्यांचा शोध घेत आहेत. विश्व विकासाचा जागतिक अजेंडा अमलात आणण्यासाठी मदतशील भूमिका घेणाऱ्यांना ते शोधत आहेत. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रस्थानी आहे. जी-२० शिखर यांनी मोदींचे कौतुक केले.

मोदी आणि भारत सरकारच्या इतर सदस्यांचे कार्य व भूमिका ही आण्विक मुद्द्यांवरील जोखीम उजागर करण्यासाठी महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. मोदी व बायडेन मिळून उभय देशांच्या संबंधांना गती देत आहेत. दोन्ही नेते १५ हून अधिक वेळा भेटले आहेत, असे भारताचे राजदूत तरणजितसिंह संधू म्हणाले. दरम्यान, भारतवंशीय नागरिकांच्या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे समकालीन रूप सादर करण्यात आले. दिवाळीपासून ते हनुक्का आणि ईदपासून ते बोधी दिनापर्यंत होते. तसेच गुरुपर्वापासून ते विविध धार्मिक सण उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाला बायडेन प्रशासनातील वरिष्ठ सल्लागार नीरा टंडन व सर्जन जनरल विवेक मूर्ती उपस्थित होते. हेही वाचा: Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये भूकंपाचा तांडव, 162 जणांचा मृत्यू, प्रियजनांच्या शोधात भटकताय लोक