मोकळ्या जागेत किंवा घरावर मोबाईल टॉवर बसवा आणि महिना 50 ते 70 हजार कमवा । Mobile Tower Installation


Last Updated on January 25, 2023 by Piyush

Mobile Tower Installation : नमस्कार मित्रांनो, मराठी बातम्या वेबसाइटवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे मोकळी जागा किंवा शहर लगत थोडी फार शेती असेल किंवा घरावर टेरेस ची जागा असेल आणि तुम्हाला त्या मोकळ्या जागेवर पैसे कमवायचे असतील, तर आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर बातमी घेऊन आलो आहोत. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल कंपनीचा टॉवर लावलात तर तुम्ही दरमहा 70 हजार ते 75 हजार रुपये सहज कमवू शकता, आज आम्ही याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

तुमच्या मोकळ्या जागेत Airtel, Jio Vodafone इत्यादी कंपनीचे मोबाईल टॉवर बसवून तुम्ही दरमहा 50000 ते 70000 रुपये कमवू शकता. तुमच्या घराच्या छतावर टॉवर बसवण्यासाठी तुम्हाला शहरी भागात राहण्याची गरज आहे.

Mobile Tower Installation

मित्रांनो, जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर लावू शकता. जर तुम्हाला तुमच्या रिकाम्या जागेवर मोबाईल टॉवर बसवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर बसून महिना 50 ते 70 हजार कमवा

आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोज पेपर वाचत असतो आणि पेपर वाचताना आपल्याला पेपरमध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती दिसतात. होय मित्रांनो, या पेपरमध्ये मोबाईल टॉवर बसवण्याच्या जाहिरातीही येत असतात. या जाहिरातीला फसवू नका जर तुम्ही या जाहिरातीला बळी पडला तर तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये 100% खरी माहिती सांगणार आहोत, त्यामुळे खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या शेतात टॉवर बसवण्यासाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. टॉवर बसवण्याचा संपूर्ण खर्च मोबाईल कंपनी करत असते, त्यामुळे टॉवर लावण्यासाठी तुम्ही कोणालाही एक रुपयाही देऊ नये.

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते?

  • जर तुम्हाला घराच्या छतावर मोबाईल टॉवर बसवायचा असेल तर तुमच्याकडे 500 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला छतावर मोबाईल टॉवर बसवायचा असेल तर तुम्ही शहरी भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुमच्याकडे 2,000 ते 2,500 चौरस फूट जागा असावी.

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Mobile Tower Installation)

  • तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असल्यास ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र.
  • तुम्ही शहरी भागातील रहिवासी असाल तर महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र.
  • ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर बसवायचा आहे त्या जागेचे उतारा.
  • ज्या कंपनीचे टॉवर बसवायचे आहे, त्यांच्याशी करार नामा झालेली प्रत.

मोबाईल टॉवर चे महिन्याला किती पैसे मिळतात?

मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर किंवा ग्रामीण भागात मोकळ्या जागेवर मोबाईल टॉवर लावला तर तुम्हाला मोबाईल टॉवर कंपनी मार्फत दरमहा 10 हजार ते 50 हजार रुपये जागेचे भाडे दिले जाते.

arrow 1

मोबाईल टॉवर बसवण्याची संपूर्ण प्रोसेस येथे पहा
येथे क्लीक करा