आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर


Last Updated on December 3, 2022 by Vaibhav

आरोग्य विभागाचा आढावा योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना

कोल्हापूर: जुना ७० वर्षांपूर्वीचा जमाना आता राहिला नसून शहरासह ग्रामीण भागातील जनतेलाही चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. मशिनरी आहेत; पण डॉक्टर्स नाहीत, अशी कारणे सांगण्यापेक्षा डॉक्टरांचे रोटेशन लावून रुग्णसेवा बजावावी, अशा कडक शब्दांत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी फैलावर घेतले, कोल्हापूर दीन्यादरम्यान सीपीआर रुग्णालयात सकाळी १० वाजता वैद्यकीय अधिकान्यांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या.

यावेळी खासदार धनंजय महाट्रिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक हक्सर हा वेदक, अधिष्ठाता डॉ प्रदीप दीक्षित सरिता थोरात अधिकारी उषा कुंभार, राजवर्धन नाईक-निंबाळकर, डॉ. गिरीश कांबळे उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभाग, सीपीआर रुग्णालय, शाहू वैद्यकीय महाविद्यालय अशा विविध विभागांनी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे मंत्री डॉ. पवार यांना माहिती दिली.दरम्यान, मंत्री पवार यांनी सोनोग्राफी मशीनसाठी टेक्निशियन उपलब्ध नाहीत, या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. आवश्यक मनुष्यबळ हव असल्यास तशी मागणी करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

संबंधित डॉक्टरांना द्यावयाच्या सूचनांबाबत बोलताना अधिकाऱ्यांना जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही पाहतो, अशा शब्दांत कानउघाडणी केली.टेलिमेडिसीन कार्यान्वित करा कोरोना काळात टेलिमेडिसीनला चांगला प्रतिसाद लाभला होता. रुग्णांसाठी ही यंत्रणा फायदेशीर असून, शहरासह जिल्ह्यामध्ये पुन्हा टेलिमेडिसीन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. सीपीआर रुग्णालय प्रशासन, तसेच जिल्हा आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मंत्री पवार यानी दिल्या.हेही वाचा: भारतामध्ये ६० टक्के नागरिकांना हेलिकोबॅक्टर पायलोरी जीवाणूंचा संसर्ग