म्हाडाची लॉटरी लागली, पण घराच्या चाव्या कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया । Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने 14 ऑगस्ट रोजी 4,083 घरांसाठी सोडत जारी केले. ज्यांना म्हाडाच्या लॉटरीनंतर घर लागली आहेत. त्या विजेत्यांना घराचा ताबा कधी मिळणार हा प्रश्न आहे. त्यासाठी आता म्हाडाकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिसूचना आणि देकार पत्र आता म्हाडाच्या विजेत्यांना पाठवले जात आहे.

वाचा : कोकण, पुणे व औरंगाबाद येथे मिळणार सगळ्यात स्वस्त घर, म्हाडाची बंपर सोडत

म्हाडाची लॉटरी 14 ऑगस्टला काढण्यात आली. सुमारे 4 हजार लोकांनी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र घरे लागले नाही अशा अर्जदारांना म्हाडाने अनामत रक्कम परत करण्यास सुरुवात केली आहे. तर विजेत्यांना सूचना आणि देकार पत्र पाठवले जात आहे. विजेत्यांना म्हाडाच्या घराचा ताबा स्वीकारण्यासाठी आणि ताबा सोडण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली जाईल. 28 ऑगस्टनंतर म्हाडाकडून देकार पत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

वाचा : डाऊनपेमेंट तयार ठेवा, दसऱ्याच्या मुहूर्तावर घ्या ठाणे, डोंबिवलीत 12 लाखात घर । Mhada Lottery 2023

म्हाडाच्या म्हणण्यानुसार घराचा ताबा देण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात 30 ऑगस्टनंतर सुरू होणार असून विजेत्यांना रक्कम जमा केल्यानंतर लगेचच घराचा ताबा देण्यात येईल. घराच्या एकूण किमतीच्या 25% रक्कम देकार पत्र पाठवल्यानंतर 45 दिवसांच्या आत भरावी लागेल. ही रक्कम वेळेवर न भरल्यास घर रद्द केले जाऊ शकते. घराचा ताबा देण्याच्या प्रक्रियेअंतर्गत अर्जदाराला आधी 25 टक्के आणि नंतर 75 टक्के रक्कम भरता येईल. म्हाडाच्या विजेत्यांना सप्टेंबरअखेर घराचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.

वाचा : म्हाडा विजेत्यांसाठी खुशखबर..! इंटिमेशन लेटर आले | Mhada Mumbai winners POL is available

म्हाडाची विजेत्यांसाठी अपडेट

कादपत्रांती पूर्तता करण्यासाठी विजेत्यांना बँकेत जावे लागत होते. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क जमा करण्यासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, विजेत्यांचा त्रास कमी करण्यासाठी म्हाडाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हाडा मुख्यालयात एकल खिडकी योजनेअंतर्गत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची व्यवस्था म्हाडा करत आहे.

वाचा : MHADA Lottery : दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी

कर्ज प्रक्रिया देखील होणार सोपी

म्हाडानेही विजेत्यांना सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हाडाने काही बँकांशी करार केला आहे. सोडतीनंतरची सर्व अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करण्याच्या त्रासापासून लोकांना वाचवण्यासाठी म्हाडाने एक मोठे पाऊल उचलले आहे. म्हाडा कार्यालयातच मुद्रांक शुल्क आणि डिजिटल नोंदणी केंद्र सुरू करत आहे. लॉटरी विजेत्यांनी मालमत्ता नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा : पुण्यात बजेटमधील घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी, पाहा काय आहेत अटी | Mhada 1bhk Flat in Pune

Leave a Comment