म्हाडा सोडत २०२० : विजेत्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२० मध्ये जाहीर केलेल्या सोडतीतील १५८ विजेत्यांना कागदपत्रे सादर करण्याकरिता मुदतवाढ दिली आहे. mhada 2bhk flat mumbai

या मुदतवाढीनुसार आता विजेत्या कामगारांना वा त्यांच्या वारसांना १० ते १८ ऑगस्ट या कालावधीत पात्रता निश्चिती करिता आवश्यक कागदपत्रे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सादर करता येणार आहेत. mhada flat mumbai

विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लीक अकरा

बॉम्बे डाईंग मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागांवर उभरण्यात आलेल्या ३८९४ घरांसाठी १ मार्च २०२० रोजी मुंबई मंडळाने सोडत काढली होती. या सोडतीतील विजेत्यांच्या पात्रता निश्चितीची आणि घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. mhada flat sale

म्हाडा सोडतीचा लेटेस्ट निकाल पाहण्यासाठी येथे क्लीक करा

असे असताना १५८ विजेत्यांनी अद्यापही आवश्यक ती कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे त्यांची पात्रता निश्चिती रखडली आहे. आता या विजेत्यांची यादी मंडळाने म्हाडाच्या https:// mhada. gov. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तर या यादीतील विजेत्यांना कागदपत्रे सादर करण्याकरिता १० ते १८ ऑगस्टदरम्यान मुदतवाढ दिली आहे.

या मुदतीत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. त्यामुळे विजेत्यांनी या मुदतीत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास त्याजागी प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना संधी दिली जाणार असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे. 3 bhk flat mumbai for sale

वाचा : आता संधी सोडू नका..! 15 ऑगस्टला सिडकोची 8 हजार घरांची लॉटरी । Flats in mumbai

Leave a Comment