MHADA Lottery Nagpur: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, नागपूरमधील घरांसाठी दिवाळीत सोडत

MHADA Lottery Nagpur : म्हाडाच्या कोकण, पुणे आणि औरंगाबाद विभागातील घरांच्या सोडतीची तयारी सुरू असतानाच आता नागपूर विभागानेही सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. नागपुरातील सुमारे 700 घरांची जाहिरात दिवाळी दरम्यान प्रसिद्ध होणार असून डिसेंबरमध्ये लॉटरी काढण्यात येणार आहे.

नवीन संगणकीकृत सोडती प्रणालीमुळे म्हाडासाठी सोडतीपूर्वी आणि सोडतीनंतरची प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यामुळेच या वर्षी आतापर्यंत मुंबई विभागातील (4082), कोकण विभाग (4654), पुणे विभाग (6058) आणि औरंगाबाद विभागात (936) घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे.

एकूणच आतापर्यंत 15 हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्यात आली आहे. आता कोकण मंडळाच्या सुमारे 5 हजार, पुणे मंडळाच्या 5 हजार आणि औरंगाबाद मंडळाच्या 600 घरांच्या लॉटरीची जाहिरात करण्याची तयारी सुरू आहे.

नागपूर विभागाचे मुख्याधिकारी महेशकुमार मेघमाळे म्हणाले की, नागपूर विभागानेही सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरातील गणेशपेठ मध्यवर्ती परिसरात सध्या नागपूर विभागाकडून एक हजार घरे बांधली जात आहेत. या प्रकल्पात 300 घरांसह इतर काही घरांसाठीही लॉटरी काढण्यात येणार आहे. यात सुमारे 700 घरे असतील आणि अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटांसाठी घरे असतील. नोव्हेंबरमध्ये जाहिराती आणि डिसेंबरमध्ये लॉटरी काढण्यात येणार असल्याचेही मेघमाळे यांनी सांगितले.

घरासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

पुण्याच्या सोडतीसाठी उद्या जाहिरात?

पुणे मंडळाने पाच हजार ( 1 bhk flat in pune) घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरु केली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात (pune mhada lottery) येणार होती. पण काही कारणाने ती लांबली आहे. मात्र आता जाहिरातीची (mhada add 2023) प्रतीक्षा संपणार आहे उद्या, जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

आज याबाबतचा निर्णय होणार आहे. उद्या जाहिरात प्रसिद्ध होऊ शकली नाही तरी या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे पुणे मंडळाचे नियोजन आहे.

वाचा : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होणार ; अवघ्या 14- 17 लाख रुपयांमध्ये म्हाडाची घरं

Leave a Comment