Last Updated on February 19, 2023 by Piyush
MHADA Konkan Mandal Lottery 2023 : प्रत्येकाला स्वतःचे घर असावे असे वाटते. याच हक्काच्या घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (MHADA) घरांची लॉटरी जाहीर केली जात आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातील 4752 घरांसाठी ही सोडत असेल. या अनुषंगाने आता तारखांची माहिती समोर आली आहे. (MHADA Lottery 2023 online application form registration result dates announce by konkan mandal apply online mhada gov in and lottery mhada gov in)
म्हाडाच्या कोकण मंडळात घरांची सोडत कधी निघणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे. कारण, म्हाडाने कोकण विभागातील घरांच्या वाटपाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 20 फेब्रुवारीपासून अर्जांची विक्री आणि स्वीकृती सुरू होईल.
सोडत कधी जाहीर होणार? MHADA Konkan Mandal Lottery 2023
कोकण मंडळाने 4752 घरांच्या सोडतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, 20 फेब्रुवारी 2023 पासून अर्जांची विक्री आणि स्वीकृती सुरू होईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 मार्च असेल. लॉटरीची सोडत 11 एप्रिल रोजी होणार आहे. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे सोडत काढण्यात येणार आहे. लोकसत्ताने या संदर्भात वृत्त दिले आहे.

कोकण मंडळाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
Important dates for MHADA Lottery 2023
- अर्जाची नोंदणी – 5 जानेवारी 2023 पासून सुरू
- अर्ज विक्री – 20 फेब्रुवारी 2023 पासून
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
- स्वीकारलेल्या अर्जांची अंतिम यादी जाहीर – 5 एप्रिल 2023
- सोडत कधी जाहीर होणार – 11 एप्रिल 2023
कोणत्या योजनेत किती घरे?
- पंतप्रधान आवास योजनेतील 984 घरे
- 20 टक्के योजनेतील 1 554 घरे
- म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 129 घरे
- प्रथम येणाऱ्याला प्राधान्य तत्वावरील 2085 घरे
कोणत्या विभागात किती घरे?
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत 340 घरे, विरार-बोळींज येथे 328 घरे, गोठेघर येथे 256 घरे, खोणी येथे 60 घरे अशी एकूण 984 घरे आहेत. या घरांची किंमत 14 लाख 96 हजार ते 21 लाखांपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे.
