Personal Loan Online 2023 : रिझर्व्ह बँकेने ‘ऑनलाइन पब्लिक टेक प्लॅटफॉर्मचा एक पथदर्शक प्रकल्प नुकताच सुरू केला आहे. त्यामुळे आता बँकांकडून चुटकीसरशी कर्जे मिळू शकतील. रिझर्व्ह बँकेच्या ‘इनोव्हेशन हब’ने हा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. यामुळे कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ होईलच; पण त्याबरोबरच कर्ज घेतानाचा खर्चही कमी होईल. (medical loan online login)
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, हा डिजिटल प्लॅटफॉर्म एक ओपन इन्फ्रास्ट्रक्चर, ओपन ‘ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस’ने (एपीआय) युक्त आहे. त्यात वित्तीय क्षेत्रातील सर्व युनिट्स प्लग अँड प्ले’ मॉडेलवर सुलभतेने जोडले जाऊ शकतील. एपीआय हे दोन ॲप्लिकेशन्सना जोडण्याची सुविधा देणारे एक सॉफ्टवेअर आहे. यात वेगवेगळी युनिट्स आकडेवारी सामायिक करू शकतात. (loans for cancer patients)
काय होत्या अडचणी?
प्राप्त माहितीनुसार, सध्या कर्ज मंजूर करताना कर्जदारास अनेक प्रकारच्या माहितीची गरज लागत होती. ही माहिती केंद्र व राज्य सरकारे, अकाउंट अॅग्रिगेटर्स, बँका आणि क्रेडिट माहिती ब्युरो यांच्याकडे असते. ती प्राप्त करण्यात कधी-कधी महिनाभराचा अवधी लागायचा. त्यामुळे कर्ज प्रक्रिया प्रलंबित राहत असे. नव्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये ही सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. (health care loan)
‘फिनटेक’ वर नजर
या प्लॅटफॉर्मद्वारे रिझर्व्ह बँकेला फिनटेक कंपन्यांवर नजर ठेवणेही शक्य होणार आहे. प्लॅटफॉर्म आणण्यामागे हाही एक उद्देश आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वैयक्तिक कर्जाचे वाटपही केले जाते. या सुविधेचाही ग्राहक मोठ्या प्रमाणात फायदा घेताना दिसतात. (bank loan for medical treatment)
कोणती कर्जे देणार? Personal Loan Online 2023
१.६ लाखांपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड कर्ज
दूध उत्पादकांचे कर्ज
विना जामीन एमएसएमई कर्ज
वैयक्तिक कर्ज
अन्य सुविधाही देणार या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ड-केव्हायसी, पॅन प्रमाणीकरण, अकाऊंड ॲग्रीगेशन आदी कामेही करणे शक्य आहे. (personal loan for medical)