Last updated on January 10th, 2022 at 12:55 pm
औरंगाबाद : ग्राहकांना १० हजारांच्या बदल्यात १ लाख रुपयांच्या बनावट नोटा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. त्यांच्या ताब्यातून दीड लाखाच्या बनावट नोटा, कलर प्रिंटर असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हे रॅकेट महाराष्ट्रभर अशाच पद्धतीने बनावट नोटा पुरवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. समरान ऊर्फ लक्की रशीद शेख (३०), नितीन कल्याणराव चौधरी (२५), अक्षय अण्णासाहेब पडूळ (२८), दादाराव पोपटराव गावंडे (४२), रघुनाथ चैनदास ढवळपुरे (४९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
भाड्याच्या खोलीत सापडला मुद्देमाल
५०, १००, ५०० रुपये दराच्या सुमारे १ लाख २० हजारांच्या बनावट नोटा, कॉम्प्युटर, प्रिंटर, कटर, स्केल, स्टॅण्डर पेपर, बनावट नोटांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन, पाच मोबाईल असा सुमारे ३ लाख १० हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहाय्यक निरीक्षक शेषराव खटाने, सहाय्यक फौजदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, दीपक जाधव, जालिंदर मांटे, संतोष पारधे, कोमल तारे, अजय कांबळे आदींच्या पथकाने केली.
पुंडलिकनगर भागातील भाजी मार्केट, वाईन शॉप या ठिकाणी बनावट नोटा देऊन वस्तू खरेदी करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली. (प्रतिकात्मक), माहितीची शहानिशा करण्यासाठी विशेष पथकाला कामाला लावण्यात आले. दरम्यान, पुंडलिकनगर रोडवरील सुपर वाईन शॉप येथे बनावट नोटा देऊन खरेदी करताना ढवळपुरे याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्याला पोलिसी खाक्य दाखवताच त्याने संघले छापणाऱ्या रॅकेटमधील सहकाऱ्यांची नावे सांगितली. पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना शहरातील विविध भागांतून अटक केली.
पोलीस पकडतील म्हणून त्याने नितीनला केले ट्रेन
लक्की हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. जामिनीवर असताना आपण थेट सहभागी होत रॅकेट सुरू केले तर पोलीस पकडतील, अशी भीती होती. यामुळे त्याने मुकुंदवाडीतील नितीन चौधरी याच्याशी मैत्री केली. नोटा कशा बनवल्या जातात, त्या कशा पद्धतीने करने कापतात, त्यांची लांबी, रुंदी किती असावी याचे प्रशिक्षण देऊन ट्रेन केले होते. मात्र एवढी गुप्तता पाळून समोर न येताही पोलिसांनी लक्कीच्या मुसक्या आवळल्या.
भाड्याच्या खोलीत सापडला मुद्देमाल
५०, १००, ५०० रुपये दराच्या सुमारे १ लाख २० हजारांच्या बनावट नोटा, कॉम्प्युटर, प्रिंटर, कटर, स्केल, स्टॅण्डर पेपर, बनावट नोटांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन, पाच मोबाईल असा सुमारे ३ लाख १० हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहाय्यक निरीक्षक शेषराव खटाने, सहाय्यक फौजदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, दीपक जाधव, जालिंदर मांटे, संतोष पारधे, कोमल तारे, अजय कांबळे आदींच्या पथकाने केली.
बनावट नोटांचा मास्टरमाइंड लक्की
समरान ऊर्फ लक्की हा उच्चशिक्षित असून तोच मास्टरमाइंड आहे. त्याला संगणक व सॉफ्टवेअरबाबत सखोल माहिती आहे. यापूर्वी २०१९ मध्ये अशाच पद्धतीने तो बनावट नोटांचे रॅकेट चालवायचा. त्यावेळी पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. जामिनीवर सुटल्यानंतर त्याने पुन्हा बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू केला.
असा चालायचा हा व्यवसाय
लक्कीच्या सूचनेने नितीन बनावट नोटा छापल्यानंतर अक्षय व दादाराव याच्याकडे द्यायचा. दोघेही बाजारात या नोटा चालवायचे. ग्राहक शोधायचे. ग्राहकांना १० हजारांच्या बदल्यात १ लाखांच्या बनावट नोटा देत असे. हे रॅकेट महाराष्ट्रभर अशाच पद्धतीने बनावट नोटा पुरवत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पाकिस्तानचा मजनु लागला मुंबईच्या पोरीच्या नादाला; थेट बाॅर्डर पार केली अन् शहरात…