सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. परिणामी, बाजार समितीची जागा साठ्यास अपुरी पडत आहे. नाशिकनंतर सोलापूर बाजार समितीतील कांद्याची मोठी आवक आहे.
सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये दररोज ४०० ते ५०० ट्रक कांद्याची आवक होत आहे. शनिवारी ७०० ट्रक कांद्याची आवक आली होती. कांदा भरून आलेल्या गाड्या बाजार समिती उतरिवण्यासाठी रात्री पर्यंत रांग लागत आहे. आलेला कांदा उतरल्यानंतर जागाही अपुरी पडत आहे.
लिलाव झाल्यानंतर त्या गाड्यामध्ये कांदा भरून घेऊन जाण्यासाठीही माथाडी कामगारांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठी आवक होत असल्याने गाड्याची वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. कांद्याच्या वाढत्या आवकमूळे इतर शेतमाल विक्री करण्याचीही अडचण निर्माण होत आहे.
विशेषतः किरकोळ पालेभाज्या विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि विक्रेत्यांना जागा मिळणे कठीण झाली आहे. सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र जरी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यापुरते मर्यादित असले तरी जिल्हासह पर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल येतो. त्यामुळे बाजार समितीला पर्यायी जागा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
सोयाबीनचे दर साडेसहा हजारांवर स्थिरावले ! शेतकऱ्यांना आता दरवाढीची प्रतीक्षा