उष्ण, दमट वातावरणात बुरशीजन्य आजारामुळे सुकतेय तुरीचे पीक


Last Updated on December 27, 2022 by Vaibhav

शेगाव: उष्ण व दमट वातावरणात बुरशीजन्य आजारामुळे तूर सुकत असल्याचा अंदाज कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. शेगाव तालुक्यात तूर सुकत असल्याबाबत वृत लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. या बातमीची दखल घेऊन मनसगाव शिवारातील शेतात तालुका कृषी अधिकारी जानकीराम राठोड व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञानी भेट देऊन तूर पिकाची पाहणी केली.

वातावरण बदलामुळे, कमी तापमान उष्ण व दमट वातावरण बुरशीजन्य आजार वातावरणातील आर्द्रता वाढणे. धुके पडणे, कमी तापमान झाल्यास शेतात शेकोटी पेटून दूर करणे, रिडो मिल्ड गोल्ड फवारणी करावी, असे आवाहन कृषी अधिकारी व संशोधकांनी केले. सद्य:स्थितीत ५ ते ५० टक्क्यांपर्यंत तूर पिकाचे नुकसान होत असल्याचेही कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.

शेतकरी कपाशी, सोयाबीन या प्रमुख पिकाचा विमा काढतात. मात्र आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. काही शेतकरी सलग तूर पीक घेतात. शेतकऱ्यांनी तुरीचाही विमा काढण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. तूर पिकाचा विमा काढल्यास झालेल्या नुकसानाची भरपाई मिळू शकते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी जानकीराम पवार, कृषी अधिकारी महेश गायकवाड, प्रमुख शास्त्रज्ञ विकास जाधव, एस. ए. बोर्डे, एस. एम. उमाळे, ए. टी. गाभने, कृषी सहायक डी. एन. राठोड, सरपंच शैलेश कंकाळ, कैलास शेळके, राहुल शेळके, शिवशंकर नाईक, रवींद्र चराटे, पोलिस पाटील, विनोद कंकळ यांच्यासह मनसगाव शिवरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेगाव तालुक्यातील तुरीवर बुरशीजन्य आजाराने नुकसान होत आहे. तूर असल्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पीक विमा संरक्षण घेण्याची गरज आहे.जानकीराम पवार, तालुका कृषी अधिकारी

हेही वाचा: कृषी मंत्रालयातून १५ कोटी वसुलीचे टार्गेट