गरिबांच्या भाकरीला श्रीमंतीची झालर; हायब्रीड ज्वारीचा दर 3200 रुपयांवर


Last Updated on December 5, 2022 by Piyush

वाशिम: कधीकाळी गव्हाची पोळी केवळ श्रीमंतांच्याच घरात लाटली जायची. इतरांच्या घरात मात्र दररोजच्या जेवणात ज्वारीची भाकरीच असायची. केवळ सणासुदीला तिचा जेवणात समावेश व्हायचा. कालांतराने ही परिस्थिती पूर्णतः बदलली असून आता दादरच नव्हे; तर हायब्रीड ज्वारीचे दरही प्रचंड वाढले असून गरिबांच्या भाकरीला श्रीमंतीची झालर चढली आहे. सध्या हायब्रीड ज्वारीचे दर ३२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असून दादर ज्वारीला ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

बाजारपेठेतील सद्यःस्थितीचा अंदाज घेतला असता, गहू आणि हायब्रीड ज्वारीचे दर समसमान पातळीवर पोहचल्याचे दिसून आले; तर दादर ज्वारीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातून ज्वारीची भाकरी जवळपास हद्दपार झाली असून गव्हाच्या चपात्यांवरच विशेष भर दिला जात असल्याची एकूण परिस्थिती निर्माण झाली आहे.

jwari rate

अलिकडच्या काही वर्षांत खरीप, रब्बी ज्वारी व गव्हाच्याही पेयात झालेली घट आणि त्याऐवजी सोयाबीन पेऱ्याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचा हा परिणाम मानला जात आहे.

अलिकडच्या काही वर्षांत गव्हापेक्षा ज्वारीचे दर तुलनेने अधिक प्रमाणात वाढले आहेत. सातत्याने पेरा घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. हायब्रीड ज्वारीचे दर सध्या ३२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विटल; तर दादर ज्वारीला ४ हजारांपेक्षा अधिकचा दर मिळत आहे. – महेंद्रसिंह सचदेव, धान्य विक्रेता, वाशिम.

ज्वारी बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/12/2022
पैठणरब्बीक्विंटल10140138013300
03/12/2022
भोकरक्विंटल5260230002801
धुळेदादरक्विंटल18250025002500
चिखलीहायब्रीडक्विंटल3135018501600
रावेरहायब्रीडक्विंटल2198025952595
अमरावतीलोकलक्विंटल3180021001950
सोलापूरमालदांडीक्विंटल21334033853385
पुणेमालदांडीक्विंटल543520058005500
बीडमालदांडीक्विंटल12220032752868
जामखेडमालदांडीक्विंटल93300038003400
अंबड (वडी गोद्री)मालदांडीक्विंटल7190034012001
वडूजमालदांडीक्विंटल200300032003100
चाकूरपांढरीक्विंटल7280039513454
मुरुमपांढरीक्विंटल1285228522852
उमरगापांढरीक्विंटल4280033003200
माजलगावरब्बीक्विंटल39260035353200
गेवराईरब्बीक्विंटल23230032502770
निलंगारब्बीक्विंटल4340037503600
जालनाशाळूक्विंटल204220037003300
चिखलीशाळूक्विंटल9220028502525
औरंगाबादशाळूक्विंटल9250029002700
परतूरशाळूक्विंटल4200025002400
देउळगाव राजाशाळूक्विंटल10250028002800

वाचा : शेतकऱ्याचा नाद खुळा..! जिरेनियम शेतीतून मिळविले लाखो रुपयांचे उत्पन्न