दिल्लीतील मालवीय नगरमध्ये एका 33 वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या केल्याच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी शनिवारी तिच्या पतीसह अन्य दोन मारेकऱ्यांना अटक केली. महिलेवर 17 वेळा चाकूने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कुमार गुल्ल्या (36) याचे एका दुसऱ्या महिलेशी संबंध होते हे अवैध्य संबंध पत्नी रीनाला कळल्याने 5 लाखांची सुपारी देऊन तिचा खून केला गेला. नवीनच्या अनैतिक संबंधामुळे रीना आणि नवीनमध्ये वारंवार भांडणे होत होती.
दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमधील शेख सराय भागात गुरुवारी ही घटना घडली आणि पोलिसांना रुग्णालयातून माहिती मिळाली की चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला तिचा पती तिथे घेऊन आला होता, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी, पोलिसांनी सांगितले कि .. रीनावर चाकूने 17 वेळा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती नवीनशिवाय कॉन्ट्रॅक्ट किलर राहुल आणि सोनू नावाच्या दोन नराधमांना अटक केली आहे.
नवीनकडे चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने डिफेन्स कॉलनीतील एका होमिओपॅथी डॉक्टरकडे मुलासह गेलो असून गुरुवारी दुपारी पत्नी रीना घरी एकटी असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली. दक्षिण दिल्लीच्या पोलिस उपायुक्त बेनिता मेरी जॅकर यांनी सांगितले की, डॉक्टरांना भेट दिल्यानंतर आणि त्यांच्या मुलासाठी काही खरेदी केल्यानंतर नवीनने त्याला शिव मंदिर डॅम रोडजवळील न्हावीच्या दुकानात सोडले आणि कालकाजी येथील त्यांच्या कार्यालयात गेले.
काही वेळाने नवीनने मुलाचे केस कापल्यानंतर त्याच्या एका कर्मचाऱ्याला घरी सोडण्यासाठी बोलावले. 4.45 वाजता नवीन यांना त्यांच्या कर्मचाऱ्याचा फोन आला की त्यांची पत्नी रीना रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. तो पटकन त्याच्या घरी पोहोचला आणि त्याच्या पत्नीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, जिथे रीनाला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज आढळून आले ज्यामध्ये दिवसभरात दोन लोक नवीनच्या घरात घुसताना दिसले आणि त्यानंतर काही वेळाने तीन लोक बाहेर जाताना दिसले.
राज्यात नवे निर्बंध लागू; रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी